घरअर्थजगतमंदीचं सावट! अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यंदा सातव्यांदा व्याजदर वाढवला

मंदीचं सावट! अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यंदा सातव्यांदा व्याजदर वाढवला

Subscribe

2023 च्या अखेरीस मुख्य अल्प मुदतीचा दर 5% ते 5.25% पर्यंत पोहोचेल, असा अंदाजही धोरण निर्मात्यांनी वर्तवलाय. काही अर्थशास्त्रज्ञांनी फक्त अर्धा-पॉइंट अतिरिक्त वाढीचा अंदाज व्यक्त केला होता

वॉशिंग्टन : फेडरल रिझर्व्हने बुधवारी यंदा सातव्यांदा आपल्या प्रमुख व्याजदरात वाढ करून महागाईविरुद्धचा आपला लढा आणखी मजबूत केला. फेडरल रिझर्व्हने त्यांचा बेंचमार्क दर अर्ध्या पॉइंटने वाढवून 4.25% हून 4.5% पर्यंत नेला आहे. 15 वर्षांतील हा त्याचा सर्वोच्च स्तर आहे. या नवीन हालचालींमुळे अनेक ग्राहक आणि व्यावसायिकांना कर्जांची किंमत वाढण्याची भीती सतावते आहे. तसेच मंदीचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

2023 मध्ये बेरोजगारीचा दर वाढू शकतो

- Advertisement -

2023 च्या अखेरीस मुख्य अल्प मुदतीचा दर 5% ते 5.25% पर्यंत पोहोचेल, असा अंदाजही धोरण निर्मात्यांनी वर्तवलाय. काही अर्थशास्त्रज्ञांनी फक्त अर्धा-पॉइंट अतिरिक्त वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. युनायटेड स्टेट्समधील चलनवाढीचा दर सलग पाचव्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये मंदावला असल्याचे एका अहवालातून समजल्यानंतर दरवाढीची घोषणा करण्यात आली. बेरोजगारीचा दर आज 3.7% वरून 2023 च्या अखेरीस 4.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे बेरोजगारीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची भीती असून, मंदीचीही शक्यता आहे.

फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांनी चार दशकांतील सर्वात वाईट चलनवाढीच्या लढाईसाठी आणि महागाईला त्याच्या 2% वार्षिक लक्ष्यापर्यंत परत पोहोचवण्यासाठी मोहिमेत सुधारणा केली आहे. अनेक पुरवठा साखळी उघडल्या आहेत, ज्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होत आहे. नोव्हेंबरच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या महागाईच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वापरलेल्या कार, फर्निचर आणि खेळण्यांच्या किमती घसरल्यात. युरोप आणि युनायटेड किंगडममध्ये महागाईदेखील थोडीशी कमी झालीय. विश्लेषकांनी युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडसोबत गुरुवारी झालेल्या त्यांच्या बैठकीत दर वाढीची गती कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -

युरो चलन वापरणाऱ्या 19 देशांमधील चलनवाढ ऑक्टोबरमध्ये 10.6% वरून 10% पर्यंत घसरली, जून 2021 नंतरची पहिली घसरण आहे. हा दर बँकेच्या 2% उद्दिष्टापेक्षा इतका जास्त आहे की, दरवाढ पुढील वर्षात सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यूकेची चलनवाढदेखील ऑक्टोबरमधील 11.1% च्या 41 वर्षांच्या विक्रमी नीचांकावरून नोव्हेंबरमध्ये 10.7% च्या पातळीवर गेलीय. मध्यवर्ती बँक उच्च महागाईवर विजय मिळवण्याच्या जवळपास नाही, अशी माहिती फेडचे चेअर जेरोम पॉवेल यांनी दिली. फेड अधिकाऱ्यांना त्यांची दरवाढ पुढे ढकलण्याआधी अधिक मध्यम चलनवाढीचे रीडिंग पाहावी लागणार आहे.

किती वेगाने दर वाढवतात, यापेक्षा ते किती काळ उच्च स्तरावर किंवा जवळ ठेवतात हे महत्त्वाचे आहे. वॉल स्ट्रीटचे गुंतवणूकदार सट्टेबाजी करत आहेत, फेड पुढच्या वर्षाच्या समाप्तीपूर्वी दरात कपात करतील आणि दर कमी करतील, अशीही अपेक्षा धोरणकर्त्यांनी वर्तवली आहे. ही घट पुढील वर्षीच्या सरकारी डेटामध्ये दिसून येईल आणि एकूण महागाई कमी होण्यास मदत होईल. पॉवेल यांचे सर्वात मोठे लक्ष हे सेवांवर आहे. काही प्रमाणात याचे कारण म्हणजे वेतनातील तीव्र वाढ महागाईत महत्त्वपूर्ण योगदान देणे आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सारख्या सेवा कंपन्या विशेषतः श्रमिक असतात. सरासरी पगार दरवर्षी 5% ते 6% वेगाने वाढत आहे.


हेही वाचाः ते ट्विटर हँडल बोम्मईंचे नाहीच, अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -