घरअर्थजगतएलआयसीमध्ये नोकर भरती

एलआयसीमध्ये नोकर भरती

Subscribe

तुम्हाला LIC मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्समध्ये असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजर या पदांसाठी व्हेकन्सी आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. LIC नं मॅनेजर पदांसाठी जी व्हेकन्सी काढलीय त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑगस्ट.

एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या ऑफिशियल वेबसाइट www.lichousing.com वर माहिती दिलीय. असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजरसाठी 300 जागा आहेत. या पदांवर निवड मेरिटच्या आधारे होईल.
शैक्षणिक पात्रता

- Advertisement -

असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजर पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराकडे 55 टक्के मार्क हवेत.असोसिएट पदासाठी पदवी परीक्षेत 60 टक्के गुण हवेत. असिस्टंट मॅनेजर पदासाठी पदवीबरोबर एमबीए पदवी हवी.
वयाची मर्यादा

दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षापर्यंत हवे. एलआयसी एचएफएलच्या मॅनेजर पदांसाठी लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूनंतर निवड होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -