घरक्राइमचर्चगेट वसतीगृह प्रकरण.. तरुणीची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या वॉचमनची आत्महत्या

चर्चगेट वसतीगृह प्रकरण.. तरुणीची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या वॉचमनची आत्महत्या

Subscribe

मुंबई : मरिन लाईन्सजवळील सावित्री फुले वसतिगृहात 19 वर्षीय मुलीच्या हत्येचे गूढ मुंबई पोलिसांनी काही तासांतच उलगडले आहे. मुलीवर अतिप्रसंग आणि तिची हत्या केल्यानंतर वसतीगृहाचा वॉचमन फरार झाला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता. पण या वॉचमनने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Churchgate hostel case.. Suicide of watchmen who killed girl after rape)

ओमप्रकाश कनोजिया असे आरोपीचे नाव असून तो गेली 18 वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मरीन लाईन्स पोलीस मुलीवर अतिप्रसंग आणि तिची हत्या प्रकरणी चौकशी करत असताना त्यांना चर्नी रोड रेल्वे ट्रॅकवर कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली असता त्यांना धक्काच बसला, कारण आत्महत्या केलेली व्यक्ती ओमप्रकाश कनोजिया होता.

- Advertisement -

मुंबईतील सावित्री फुले वसतिगृहात याच रक्षकाने आधी मुलीची हत्या केली आणि त्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ जाऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हत्या झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मुलीचा स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर सकाळी ७ वाजता रेल्वे पोलिसांना ओमप्रकाश कनोजिया यांचा मृतदेह चर्नी रोडच्या रेल्वे रुळाजवळ आढळून आला.

वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी आरोपी ओमप्रकाश कन्नौजियाची ओळख पटवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील एका मुलीच्या खोलीचा दरवाजा बंद असून तो उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सकाळपासून मुलगी खोलीत आहे की बाहेर हे समजू शकत नव्हते. त्यांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दरवाजा उघडला असता मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडलेला आढळून आला.

- Advertisement -

सुरक्षारक्षक सीसीटीव्हीत दिसत होता
प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, वसतिगृहाची खोली उघडली असता तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला. खोलीतून सर्व बोटांचे ठसे आणि इतर पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया हा गेल्या 18 वर्षांपासून याठिकाणी कार्यरत असून, त्यांच्याविरुद्ध अशी कोणतीही आक्षेपार्ह तक्रार आलेली नाही. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या वसतिगृहात ही घटना घडली ते दक्षिण मुंबईतील सरकारी वसतिगृह आहे. अशा स्थितीत एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना या संदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत, ज्यानुसार ओमप्रकाश कनोजिया सकाळी 4.55 वाजता वसतिगृहातून बाहेर पडताना दिसत आहे. अशा स्थितीत हत्येच्या घटनेनंतर ओमप्रकाश वसतिगृहातून बाहेर आल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. तसेच पीडित मुलगी अकोल्याची असून वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील एका स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करतात.

मुलीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मानेवर जखमा
प्राथमिक तपासात मुलीच्या मानेवर व गुप्तांगावर जखमेच्या खुणा आढळल्याने या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ओमप्रकाश कनोजियाविरुद्ध भादंवि कलम ३०२ आणि ३७६ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत आरोपी विवाहित असून त्याला 12 वर्षांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -