घरमहाराष्ट्रWeather Update : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; मान्सूनवर परिणाम

Weather Update : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; मान्सूनवर परिणाम

Subscribe

मुंबई : मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्मिती पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी (6 जून) जाहिर केले. त्यामुळे या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम होणार नसला तरी येणाऱ्या मान्सूनवर मात्र परिणाम होणार आहे. (Weather Update : Cyclone Biperjoy in Arabian Sea; Effect on Monsoon)

सध्या अरबी समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे चक्रीवादळाला मोठी ऊर्जा मिळत असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. बांगलादेशाने चक्रीवादळाला दिलेल्या ‘बिपरजॉय’ या नावाचा अर्थ आपत्ती असा होतो. सध्या चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर नैऋत्येला असून, ताशी चार किलोमीटर वेगाने त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये ‘बिपरजॉय’ तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून 920 किमी अंतरावर आहे. याशिवाय मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून 1120 किमी अंतरावर आहे. त्यामुळे चक्रीवादळाला महाराष्ट्राच्या किनारी भागांत धडकण्यासाठी किमान 36 तासांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत त्याचा वेगही फार कमी होणार आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून दूर असून, उत्तरेच्या दिशेने जात असल्यामुळे भारताला या चक्रीवादळाचा धोका नाही, मात्र, चक्रीवादळाभोवती फिरणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो. पुढील तीन दिवस कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

मान्सूनवर होणार परिणाम
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा केरळमधील मान्सूनच्या आगमनावरही परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठल्यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी आता सलग पावसाची प्रतीक्षा आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येईल, असे हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -