घरक्राइमFiring On Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळ्या झाडून...

Firing On Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून; कोथरुडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’

Subscribe

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहर एक नव्हे तर अनेक गुंड सक्रीय आहेत. यामधील अनेकांवर पोलीस कारवाई करतात मात्र, अद्यापही अनेक गुंड मोकाटच आहे. तर अशाच कुख्यात गुंडामध्ये टोळीयुद्ध हे होतच राहते. याच गुन्हेगारी वचर्स्ववादातून गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज शुक्रवारी (5 जानेवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली.

पुणे : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता पुसत जात असल्याचे चित्र आहे. कारण, पुण्यात मागील अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. कधी याच पुण्यात कोयता गॅंगची दहशत पसरते तर कधी ड्रग्ज प्रकरण राज्याचं लक्ष वेधून घेते. याच पुण्यातून आज पाच जानेवारी रोजी गोळीबारीची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोथरूडममधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञातानी गोळीबार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी झाडलेल्या चार गोळ्यांपैकी एक गोळी मोहोळ याला लागली होती. उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. (Firing On Sharad Mohol Firing on Sharad Mohol a notorious gangster in Pune Mulshi Pattern in Kothrud)

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहर एक नव्हे तर अनेक गुंड सक्रीय आहेत. यामधील अनेकांवर पोलीस कारवाई करतात मात्र, अद्यापही अनेक गुंड मोकाटच आहे. तर अशाच कुख्यात गुंडामध्ये टोळीयुद्ध हे होतच राहते. याच गुन्हेगारी वचर्स्ववादातून गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज शुक्रवारी (5 जानेवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली. या हल्ल्यात मोहोळची हत्या झाल्याची आता समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘औरंगजेब, अफजल खान काय खात होते? याचं प्रवचन आव्हाडांनी द्यावं’; Shrikant Shinde नी सुनावलं

गोळीबारीत मोहोळ मृत्यू

कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ हा कोथरूडमधील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर आज शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अज्ञातानी गोळीबार केला. झालेल्या गोळीबारामध्ये चारपैकी एक गोळी कुख्यात गुंड शरद मोहोळ यास लागली असून, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा : BJP MLA : भाजप आमदाराने लगावली पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात! पुण्यातील प्रकार, व्हिडीओ व्हायरल

खून, अपहरणासारखे अनेक गुन्हे दाखल

शरद मोहोळ हा पुण्यातील एक गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अपहरण, खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि खुनासारखे गुन्हे मोहोळच्या विरोधात दाखल आहेत. पिंटू मारणे खून प्रकरणात शरद मोहोळला अटक झाली होती. येरवडा कारागृहामध्ये त्याने सिद्दीकी नामक इसमाचा खून केला होता. मात्र पुराअभावी त्याची मुक्तता झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -