घरक्राइमगरोदर गर्लफ्रेंडला मारली मिठी अन् काही सेकंदात केलं खल्लास

गरोदर गर्लफ्रेंडला मारली मिठी अन् काही सेकंदात केलं खल्लास

Subscribe

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील बालूघाटात अल्पवयीन मुलीच्या हत्येबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराला या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जमीन प्रकरणातील वादविवादात झालेल्या अपहरणानंतर या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली नाही तर प्रेम प्रकरणात ही हत्या करण्यात आली, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दिलेली माहिती ऐकून सर्वच हैरान होतील हे नक्की. प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रेमाने जवळ घेतले आणि मिठी मारली, आणि काही सेंकदात तिची चाकूने गळा कापून हत्या केली.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रेम प्रकरणातील हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलीस जमिनीच्या वादात करण्यात आलेल्या अपहरणाची एफआयआर बदलणार असून आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बादपूर बालूघाट येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला. शनिवारी पलामूचे पोलिस अधीक्षक संजीव कुमार यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आणि सांगितले की, अल्पवयीन मुलाची हत्या तिचा प्रियकर ओम प्रकाश सिंग याने त्याचा साथीदार नीरजकुमार सिंग याच्या मदतीने केली.

- Advertisement -

…आणि गळ्यावर चाकूने केले वार

पोलिसांनी केलेल्या तपासातून असे समोर आले की, अल्पवयीन प्रेयसी ही गरोदर होती. त्यामुळे तिचा प्रियकर ओम प्रकाशला ती लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र तो लवकर मान्य होत नव्हता. त्यानंतर दोघांनीही गर्भपात करण्याची योजना आखली मात्र त्यासाठी त्यांना दहा हजार रुपये आवश्यक होते. अशा स्थितीत ओम प्रकाशने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीची हत्या करण्याचा कट रचला. २१ फेब्रुवारी रोजी प्रियकराने त्यांच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गावातील शाळेजवळ बोलावलं होतं. प्रेयसी गरोदर असल्याने घाबरलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे भेटायला बोलवण्याच्या बहाण्याने प्रियकराने दिलासा देत तिला मिठी मारली आणि प्रेमाने जवळ केलं. दरम्यान तिच्याशी भावनिक गप्पा मारत गळ्यावर धारदार चाकूने वार केलेत.

यावेळी प्रियकराने गळ्यावर चाकूने अनेक वार केल्यामुळे या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मुलीचा मृतदेह मोटारसायकलच्या मध्यभागी बसवून तो सोन नदीच्या काठी नेऊन एका ठिकाणी वाळूच्या आत पुरला. एका आठवड्यानंतर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी चांगलाच तपास सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून नदी किनारी पुरलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह असल्याने तिचा चेहरा जळल्यासारखा दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

या अल्पवयीन मुलीचे ओम प्रकाश सिंह या तरूणाशी प्रेम सबंध होते. या दोघांची बऱ्याच दिवसांपासून ओळख होती. यातूनच त्यांच्या प्रेमाचे सबंध निर्माण झाले. दरम्यान तिचा प्रियकर कामासंदर्भात बाहेरगावी गेला होता. तेव्हा देखील त्यांचा संपर्क होत होता. यामध्ये त्यांची जवळीक वाढली आणि ती गरोदर राहिली. हाच प्रकार लपवण्यासाठी त्याने तिला संपवण्याचा कट रचला. मात्र या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -