घरक्राइममुंबईतील झवेरी बाजारात ईडीची छापेमारी, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची छापेमारी, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त

Subscribe

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांची देशभरात छापेमारी सुरूच असून त्यातून या यंत्रणांना मोठे घबाड सापडत आहेत. मुंबईतील झवेरी बाजारात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चार ठिकाणी छापे टाकले. या छाप्यादरम्यान ईडीला सोने-चांदीसर मोठे घबाड हाती लागले आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्स यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 92 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त केली आहे. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली.

- Advertisement -

तत्पूर्वी, ईडीने 8 मार्च 2018मध्ये मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध पीएमएलए कायदा 2002च्या तरतुदींनुसार मनी लॉण्डरिंग प्रकरणाची नोंद केली होती. या कंपनीने अनेक बँकांना फसवून 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीकरिता विविध खात्यांमध्ये पाठवले गेले. कर्ज घेण्याचा उद्देश वेगळा होता आणि अशा व्यवहारांसाठी कोणतेही करार केले गेलेले नव्हते. ईडीने यापूर्वी 2019मध्ये 158.26 कोटी जप्त केले होते.

- Advertisement -

छापेमारीत काय आढळले?
ईडीने बुधवारी केलेल्या या छापेमारीदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या खासगी लॉकर्सची झडती घेण्यात आली. तसेच, योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते, केवायसीचे पालन केले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नाही, आत आणि बाहेर नोंदीसाठी कोणतेही रजिस्टर ठेवण्यात नव्हते, याबाबी उघड झाल्या.

लॉकर परिसराची झडती घेतली असता तेथे 761 लॉकर्स होते ज्यापैकी 3 मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर्स चालवताना दोन लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी जप्त करण्यात आली. मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे.

तीन महिन्यांत 100 कोटी जप्त
ईडीने गेल्या तीन महिन्यांत देशातील विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत 100 कोटींची रोकड जप्त केली आहे. सर्वात अलीकडेच कोलकाता येथील मोबाईल गेमिंग अॅप्लिकेशनशी संबंधित फसवणूक केल्याप्रकरणी सुमारे 17 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -