घरक्राइमIndore incident : 'धर्म बदनाम करतेयस,' मुलीला तरुणांचा आगाऊपणाचा सल्ला, मित्राला मारहाण

Indore incident : ‘धर्म बदनाम करतेयस,’ मुलीला तरुणांचा आगाऊपणाचा सल्ला, मित्राला मारहाण

Subscribe

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) रात्री दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांवर (MBBS students) धार्मिक कारणावरून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित दखल घेत, दोन आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोघांपैकी एकाला लोकांनी मारहाण केली तर, सोबतची मुलगी मुस्लीम (Muslim girl) होती आणि तिचे धार्मिकदृष्ट्या बौद्धिक घेण्यात आले.

- Advertisement -

इंदूरच्या तुकोगंज (Tukoganj area) पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेलमधून भावेश (Bhavesh) आणि त्याची मैत्रिण परतत असताना रिगल स्क्वेअरजवळ आरोपींनी त्यांची स्कूटर अडविली. काही लोकांनी भावेशला थप्पड मारली आणि त्याच्या मुस्लीम मैत्रिणीला धर्माच्या नावाखाली सल्ला देण्यास सुरुवात केली. मुस्लीम समाजातील नसलेल्या व्यक्तीसोबत ती का जात आहे, असे त्या मारहाण करणाऱ्या मुलांनी तिला प्रश्न केला. त्यानंतर वाद वाढला. व्हायरल व्हिडीओमध्ये, हल्लेखोर या विद्यार्थ्यांचा पाठलाग करताना आणि रिगल स्क्वेअरजवळ थांबवताना दिसत आहेत. तू आपल्या धर्माची बदनामी करत आहे. पालकांचे नाव तू खराब करत आहे, असे तिथे जमलेला जमाव त्या मुलीला सुनावत असल्याचे या व्हिडीओत दिसते.

आरोपी व त्याच्या साथीदारांनी स्कूटरला घेराव घालून भावेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी मध्यस्थी केल्यावर अन्य आरोपी शोएबच्या मित्राने एकावर चाकूने हल्ला केला. त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. त्यात ते दोघेही जखमी झाले. हिमांशू पटेल आणि यश जोशी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात शोएबसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न यासह भादविंच्या इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -