घरक्राइमकाळाचौकी परिसरातून गायब झालेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची आईकडूनच हत्या

काळाचौकी परिसरातून गायब झालेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची आईकडूनच हत्या

Subscribe

जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असे सांगून महिलेला बेशुद्ध करत तिच्या तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची एक घटना बुधवारी मुंबईच्या काळाचौकी परिसरातून समोर आली होती. मात्र या अपहरण झालेल्या मुलीची तिच्याच आईने हत्या केल्याची संतापजनक घटना आज समोर आली आहे. पोटची मुलगी नको असल्याने आईनेच या मुलीचा जीव घेतला आहे. घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून चिमुकलीची आईकडून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चिमुकलीच्या आरोपी आईने आपली चिमुकली गायब झाल्याचा बनाव केला होता. अगदी दाटीवाटीच्या परिसरातून चिमुकली गायब होण्याची घटना म्हणजे एक धक्कादायक बाब होती. मात्र पोलीस तपासात चिमुकलीच्या आईनेच तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. या आईला यापूर्वीही एक मुलगी होती, मात्र दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिने या मुलीची हत्या केली.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

आरोपी महिला ३० नोव्हेंबरला घरात एकटी होती. यावेळी तिच्याकडे एक भांडीवाली आली होती. यावेळी जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असे सांगून आरोपी महिलेच्या तोंडावर भांडीवालीने क्लोरोफॉम लावत तिला बेशुद्ध केले आणि तिच्या तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण झाल्याचा गुन्हा आरोपी आईने नोंदवला होता.

यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करताना आरोपी महिलेने सांगितले की, भांडीवालीला टच स्क्रीन मोबाईल हवा असल्याने  आरोपी महिला मोबाईल आणण्यासाठी खोलीत गेली. यावेळी तिची तीन महिन्यांची चिमुरडी पलंगावर झोपली होती. तेव्हा भांडीवाल्या महिलेने आपल्या नाकावर बेशुद्ध करण्याचे क्लोरोफॉम औषध लावून बेशुद्ध केले आणि तिच्या मुलीला घेऊन भांडीवाली पसार झाली. असा दावा आरोपी महिलेने केला.

- Advertisement -

परंतु मुंबईसारख्या परिसरात अशी घटना समोर आल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना आईवरचं संशय आला. पोलिसांनी आपला पोलीस खाक्या दाखवत आईकडून घडलेले खरा घटनाक्रम उघड करुन घेतला. तेव्हा आरोपी आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची कबुली दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -