घरक्राइमNagpur Crime: नागपुरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत दोन खून

Nagpur Crime: नागपुरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत दोन खून

Subscribe

नागपुरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत दोन खून झाल्यानं नागपूर हादरलं आहे. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला आहे. या दोन्ही घटना तहसील व सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

नागपूर: नागपुरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत दोन खून झाल्यानं नागपूर हादरलं आहे. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला आहे. या दोन्ही घटना तहसील व सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. (Nagpur Crime Two murders in Nagpur police station within 24 hours)

मोमीनपुरा परिसरात बुधवारी पहाटे एका 52 वर्षीय प्रॉपर्टी डीलरची त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जमील अहमद असं मृताचं नावं आहे. तो हॉटेल रेहमान चौकातील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमील आणि परवेज हे प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात भागीदार होते. मालमत्तेच्या पैशाच्या वाटणीवरून अलीकडे दोघांमध्ये वाद सुरू होते. जमील आणि परवेझ या दोघांमध्ये यापूर्वीही याच मुद्यावरून भांडण झालं होतं.

बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास परवेज त्याच्या दोन साथीदारांसह जमीलच्या घराजवळ आला. अलकरीम हॉटेलचे मालक जमील हे त्यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत रिसेप्शनवर होते. मालमत्तेवरून मागील भांडणामुळे संतप्त झालेल्या परवेझने बंदूक काढली आणि जमीलच्या डोक्यात गोळी झाडली. जमीलच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

संशायामुळे घेतला पत्नीचा जीव

दुसरी घटना अशी की, अनुसिया उर्फ दिव्या श्यामकिशोर गजाम (24, शीतला माता चौक, ईपीएफ ऑफिस क्वार्टर) असं मृत महिलेचं नाव आहे. ती 10 दिवसांअगोदरच पती श्यामकिशोर गजाम याच्यासह नागपुरात मजुरीच्या कामासाठी आली होती. श्यामकिशोर हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा यातूनच वाद टोकाला गेला आणि त्यानं लोखंडी पाईपने दिव्यावर वार केले. तिचा जीव गेल्यावर श्यामकिशोर तिथून फरार झाला. पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा: धम्मचक्र प्रवर्तन दिन : क्रांती टिकवायची असेल तर क्रांतीची मुल्य जोपासली पाहिजेत – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -