घरताज्या घडामोडीधम्मचक्र प्रवर्तन दिन : क्रांती टिकवायची असेल तर क्रांतीची मुल्य जोपासली पाहिजेत...

धम्मचक्र प्रवर्तन दिन : क्रांती टिकवायची असेल तर क्रांतीची मुल्य जोपासली पाहिजेत – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Subscribe

अकोला : 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना सदिच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या मुक्ती लढ्याचा परिपाक, मुक्तीच्या अंतिम शाश्वत मार्गावर ज्या दिवशी आम्ही आरूढ झालो, तो धम्मचक्र प्रवर्तन दिन. क्रांती टिकवायची असेल, तर क्रांतीची मूल्य प्रामाणिकपणे जोपासली पाहिजेत, रुजवली पाहिजेत हेच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आपणा सर्वांना अशोक विजयादशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक सदिच्छा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करुन लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षा भूमीवर बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला येथे ‘हिंदू धर्मात जन्मलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांचा अभ्यास करुन जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या आणि भारतीय मातीतील बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याच निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. नागपूर येथील दीक्षाभूमीवर आज देश-विदेशातून आंबेडकर-बौद्ध अनुयायी येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याठिकाणी लोखांच्या संख्येने पुस्तकांची विक्री होते.

- Advertisement -

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘ती’ दोन भाषणं वारंवार वाचा, ती…; सरसंघचालकांनी कार्यकर्त्यांना दिला सल्ला

उद्या (25 ऑक्टोबर) रोजी अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 39 वर्षांपासून सलग हा धम्म मेळावा पार पडत असतो. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित असतात.

- Advertisement -

अकोला येथे होणाऱ्या धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. अॅड. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सध्या उद्धव ठाकरे यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी अॅड. आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिले आहे. मात्र त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर अकोल्यातील रॅलीत काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -