घर क्राइम संतापजनक! पतीने पोलीस पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येनंतर स्वत: केली आत्महत्या

संतापजनक! पतीने पोलीस पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येनंतर स्वत: केली आत्महत्या

Subscribe

बुलढाणा : पतीने पोलीस दलातील कार्यरत असलेल्या वर्षा कुटे आणि दीड वर्षांच्या चिमुकल्याची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील ही घटना आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या वर्षा किशोर कुटे, दीड वर्षांचा मुलगी कृष्णा किशोर कुटे पती किशोर कुटेनी धारधार शस्त्राने हत्या केली. यानंतर पती किशोर कुटेने स्वत: आत्महत्या केली असून किशोर कुटेंनी कुटुंब संपवण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

बुलढाण्याच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये वर्षा कुटे या कार्यरत होत्या. वर्षा कुटेचे पती हे शेतकरी होते. वर्षा कुटे आणि किशोर कुटे यांना आठ वर्षाची आणि दीड वर्षांच्या दोन मुली आहेत. आज वर्षा कुटे या दुपारीच्या सुमारास कर्तव्या बजावल्यानंतर घरी परतल्या. तेव्हा पती किशोर कुटेंनी पत्नींची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. यानंतर आपल्या दीड वर्षाची चिमुकलीची देखील हत्या केली. पत्नी आणि मुलींची हत्या केल्यानंतर किशोर कुटेंनी शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांगलगाव शिवारात जाऊन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! पतीने पत्नीसह मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न; महिलेची पोलिसात तक्रार

या दुर्दैवी घटनेत पत्नी, पती आणि दीड वर्षांची चिमुकलीची हत्या झाली. यात किशोर आणि वर्षांची आठ वर्षांची मुलगी ही शाळेत गेल्याने बचावली. पतीने पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची क्रुरपणे हत्या केल्याने बुलढाण्याचा जिल्ह्यात एकच खळबळ माजली.

- Advertisement -

- Advertisment -