घरक्राइमThreat Call : 40 विमानांमध्ये बॉम्ब ठेवलाय, इंडिगोला धमकीचा फोन; तपास करताच...

Threat Call : 40 विमानांमध्ये बॉम्ब ठेवलाय, इंडिगोला धमकीचा फोन; तपास करताच…

Subscribe

पुण्यातील इंडिगो एअर लाइन्सला एक फेक कॉल आला. त्यामध्ये चाळीस विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले. या कॉलचा तपास केला असता प्रदेशातील कानपूर येथील सेन पश्चिमपारा भागातील पोलिसांनी आयुक्तालय पोलीस आणि गुन्हे शाखेला माहिती दिली.

पुणे : हॅलो इंडिगो एअरलाइन्स, तुमच्या 40 हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. लवकरच त्या सर्वांमध्ये स्फोट होईल. पुण्यातील इंडिगो एअरलाइन्सच्या एअरलाइन्स कंपनीच्या नियंत्रण कक्षात असे फोन आल्यावर एकच खळबळ उडाली. नियंत्रण कक्षाच्या कर्मचार्‍यांनी उच्च अधिकार्‍यांना माहिती दिली असता, चौकशीत हा फोन उत्तर प्रदेशातील कानपूर येथील सेन पश्चिमपारा भागातील असल्याचे निष्पन्न झाले. या फेक कॉलचा शोध घेतला असता पोलिसांना धक्कादाय मिळाली. (Threat Call Bombs planted in 40 planes threat call to IndiGo Upon investigation)

पुण्यातील इंडिगो एअर लाइन्सला एक फेक कॉल आला. त्यामध्ये चाळीस विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले. या कॉलचा तपास केला असता प्रदेशातील कानपूर येथील सेन पश्चिमपारा भागातील पोलिसांनी आयुक्तालय पोलीस आणि गुन्हे शाखेला माहिती दिली. आरोपीच्या शोधात पोलीस रात्री उशिरा आरोपीच्या घरी पोहोचले असता प्रकरण उलटेच निघाले. फोन करणारा हा 15 वर्षांचा मुलगा होता. मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी आपण हा डाव अवलंबल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. आरोपी मुलाची चौकशी करण्यात येत आहे. अन्य नेटवर्कचाही तपास सुरू असल्याचे डीसीपी क्राइम सलमान ताज पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मुलाने चौकशीदरम्यान सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध टीव्ही आणि इंटरनेटवर पाहिल्यानंतर त्याने हा प्रकार केला. त्या मुलाने वडिलांच्या फोनवरून इंडिगो कस्टमर केअरला फोन केला. कस्टमर केअरचा फोन येताच मुलाने सांगायला सुरुवात केली की, शहरातील व्हीआयपी परिसरात इंडिगो एअरलाइनची 40 विमाने कोसळणार असल्याची ठोस माहिती आपल्याकडे आहे. फ्लाइटच्या कस्टमर केअरला फोन करणाऱ्यांना त्याच्या बोलण्याने आश्चर्य वाटले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. एअरलाइन्सने त्यांची चौकशी केली असता हा कॉल यूपीमधील कानपूरमधून करण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर कंपनीने उत्तर प्रदेश पोलीस प्रमुखांना (डीजीपी) माहिती दिली.

हेही वाचा : PM Janman: ‘ज्यांना कोणीही विचारले नाही, मोदी त्यांना विचारतात, त्यांची पूजा करतात’, पंतप्रधानांचं वक्तव्य

- Advertisement -

डीजीपीच्या सूचनेवरून कानपूर पोलीस तत्काळ अलर्ट मोडमध्ये आले. पोलिसांनी फोन नंबरचे लोकेशन तपासले असता फोन अजूनही अॅक्टिव्ह असल्याचे आढळून आले. मिळालेल्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पश्चिम पारा पोलिस ठाण्याच्या न्यू आझाद नगर चौकीजवळ असलेल्या एका घरापर्यंत पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून एका मध्यमवयीन व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या 15 वर्षांच्या मुलाने हा फोन केल्याचे समोर आले. आरोपी मुलगा हायस्कूलमध्ये आहे. यानंतर पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने हे प्रसिद्धीस येण्यासाठी केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलाची चौकशी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -