घरदेश-विदेशCoronavirus Death: जगभरात कोरोनाने घेतला १ लाख ८० हजार लोकांचा बळी!

Coronavirus Death: जगभरात कोरोनाने घेतला १ लाख ८० हजार लोकांचा बळी!

Subscribe

दोन तृतीयांश फक्त युरोपातील रूग्णांची संख्या आहे.

दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढत आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाने १ लाख ८० हजार लोकांचा बळी घेतला आहे. त्यामध्ये साधारण दोन तृतीयांश फक्त युरोपातील रूग्णांची संख्या आहे. हा आकडा अधिकृत सुत्रांमार्फत स्पष्ट करण्यात आला आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा व्हायरस समोर आला होता.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात १ लाख ८० हजार २८९ लोकांचा मृत्यू झाला असून २५ लाख ९६ हजार ३८३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये १ लाख १२ हजार ८४८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर १२ लाख ६३ हजार ८०२ लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत ४५ हजार १५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे २५ हजार ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, स्पेनमधील २१ हजार ७१७, फ्रान्समध्ये २१ हजार ३४० आणि ब्रिटनमधील १८ हजार १०० लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

- Advertisement -

CoronaVirus: या पेक्षाही वाईट वेळ जगावर येणार आहे, WHO ने दिला इशारा

अधिक काळ राहणार कोरोना – WHO

बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)असा इशारा दिला की, कोरोना व्हायरस दीर्घकाळापर्यंत समाजामध्ये राहील. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने म्हटले होते की, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांमध्ये कोरोनाच्या सुरूवातीपासूनच धोकादायक परिस्थिती दिसून येत आहे. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी काढण्यास घाई करू नका, असा सल्लाही दिला आहे.

WHO ने दिला संपूर्ण जगाला इशारा

तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस एॅधानॉम घेबरेयेसस यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की, कोरोना व्हायसच्या संकटातील सर्वात वाईट वेळ येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजून कमी झाला नसून बहुतेक देश लॉकडाऊनचे नियम शिथील करत आहेत. परंतु महामारीच्या धोका अजून वाढणार आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्यावर विश्वास ठेवा. अद्यापही काही लोकांना हा व्हायरस समजलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -