घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: या पेक्षाही वाईट वेळ जगावर येणार आहे, WHO ने दिला इशारा!

CoronaVirus: या पेक्षाही वाईट वेळ जगावर येणार आहे, WHO ने दिला इशारा!

Subscribe

ज्या देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस एॅधानॉम घेबरेयेसस यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की, कोरोना व्हायसच्या संकटातील सर्वात वाईट वेळ येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजून कमी झाला नसून बहुतेक देश लॉकडाऊनचे नियम शिथील करत आहेत. परंतु महामारीच्या धोका अजून वाढवणार आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्यावर विश्वास ठेवा. सर्वात वाईट दिवस अजून दिसायचा आहे. अद्यापही काही लोकांना हा व्हायरस समजलेला नाही.

यावेळी त्यांनी जगभरातील जवळपास १ लाख ६६ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान आफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरू होईल असा जागतिक आरोग्य संघटनेने दावा केला. आफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्यामुळे हा आजार परसणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

- Advertisement -

काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर जागातिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेबरेयेसस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, व्हायरस रोखण्यासाठी देशातील नागरिकांना शिक्षित, प्रोत्साहित आणि सक्षम करणे आवश्यक आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाखाहून अधिक असून १ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन इथे आढळले आहेत. या महामारीमुळे जगातील वातावरण दिवसेंदिवस भीतीदायक होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LockDown: नेटफ्लिक्स आणि डिस्नेचे फेक पेज तयार करून लोकांची फसवणूक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -