घरदेश-विदेशबँक कर्मचाऱ्यांसाठी नव्या 'आय मॉडिफाइड रिक्स मॅनेजमेंट' गाइडलाईन्स, मिळणार १० दिवसांची सरप्राइज...

बँक कर्मचाऱ्यांसाठी नव्या ‘आय मॉडिफाइड रिक्स मॅनेजमेंट’ गाइडलाईन्स, मिळणार १० दिवसांची सरप्राइज रजा

Subscribe

बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक कर्मचाऱ्यांना दिलासाजनक असा मोठा निर्णय घेतला आहे. सवेदनशील पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० दिवसांची सरप्राइज लिव्ह म्हणजेच कोणताही सुचना न देता किमान १० दिवसांची सुट्टी देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. आरबीआयचा हा आदेश शेड्यूल व्यावसायिक बँकांव्यतिरिक्त ग्रामीण विकास बँक आणि सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांनाही लागू असणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांना दहा दिवसांची सरप्राइज सुट्टी

रिझर्व्ह बँकेच्या २०१५ च्या परिपत्रकानुसार, ट्रेझरी ऑपरेशन, करन्सी चेस्ट, रिस्क मॉडेलिंग, मॉडेल वॅलिडेशन यांसारख्या संवेदनशील विभागांमध्ये काम करणाऱ्या बँकर्सच्या पदांची यादी जारी केली जाईल, त्यानुसार त्यांना प्रत्येक वर्षी ‘Mandatory Leave’अंतर्गत १० दिवसांची प्रासंगिक रजा देण्यात येईल. या नियमानुसार, बँकर्सना या सुट्टीची कोणताही पूर्वसुचना दिली जाणार नाही. यामुळेच त्याला सरप्राईज लिव्ह म्हटले आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेने जारी केले आदेश

सुधारित जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वाअंतर्गत सरप्राइज लिव्ह देण्याचे धोरण तयार करण्यासाठी ग्रामीण विकास बँक, सहकारी बँकेसह अन्य बँकांना आरबीआयने एक आदेश जारी केला आहे. या बँकांना त्यांच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार संवेदनशील पदांची यादी तयार करण्यासह आणि वेळोवेळी यादीचा आढावा घेण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. तसेच आरबीआयने या बँकांना सहा महिन्यांत सुधारित सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.

फिजिकल वर्कची कोणतीही जबाबदारी नाही

सरप्राइज रजेदरम्यान बँक कर्मचार्‍यांना अंतर्गत / कॉर्पोरेट ईमेल वगळता कोणत्याही प्रकारचे फिजिकल अथवा वर्चुअल काम करण्याची आवश्यता नसेल. बँक कर्मचाऱ्यांकडे अंतर्गत / कॉर्पोरेट ईमेलची सुविधा उपलब्ध असते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -