घरदेश-विदेशमुनस्यारीमध्ये अडकले ११ पर्यटक, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात

मुनस्यारीमध्ये अडकले ११ पर्यटक, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात

Subscribe

लियाटॉपपासून तीन किलोमीटर अंतरावर भैंसियाताल नावाचे ठिकाण आहे. दिल्लीतील ११ पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी गेले होते

उत्तराखंड येथील पर्यटनस्थळ असलेल्या खलियाटॉपमध्ये तब्बल ११ पर्यटक अडकले आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सध्या या ठिकाणी मोनाल संस्थेचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने बचावकार्य करत आहेत. अंधार झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत असून खलियाटॉपपासून तीन किलोमीटर अंतरावर हे सगळे पर्यटक अडकले आहेत.

हरिश्चंद्रगडावर अडकलेले ट्रेकर्स उतरायला सुरुवात…

कुठे अडकले पर्यटक?

खलियाटॉपपासून तीन किलोमीटर अंतरावर भैंसियाताल नावाचे ठिकाण आहे. दिल्लीतील ११ पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी गेले होते. हे ठिकाण पाहून झाल्यानंतर परतताना संध्याकाळ झाली. ते रस्ता भटकले आणि या परीसरात अडकून पडले. आपण हरवलो आहे हे कळताच त्यांच्यातील एकाने डीडीहाटच्या उपजिल्हाधिकारी वैभव गुप्ता यांना फोन लावून जंगलात अडकल्याची माहिती दिली. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने मोनाल या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -