आज तब्बल १४१ रेल्वे रद्द, घराबाहेर पडताना ‘ही’ लिस्ट जरूर चेक करा

विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा ट्रेन रद्द किंवा वेळेत बदल केले जातात. तसेच अनेकदा मार्गही बदलला जातो.

72 hours jumbo mega block on Central Railway thane diva , 437 trains canceled, see full schedule

कमी वेळेत आणि कमी खर्चात गंतव्य स्थानापर्यंत पोहोचता येतं म्हणून सामान्य वर्गाकडून रेल्वे सेवेचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा ऐनवेळी बुक केलेल्या रेल्वे रद्द (Trains cancelled) किंवा रिशेड्युल्ड (Rescheduled) केल्या जातात. त्यामुळे आपल्या ठरलेल्या तारखेला लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडण्याआधी ती रेल्वे वेळेत आहे की नाही एकदा जरुर पाहावं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १० जून रोजी तब्बल १४१ रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवशांना याचा नाहक त्रास होऊ शकतो. (141 Indian Railway cancelled updated by IRCTC)

हेही वाचा रेल्वे प्रवासात अतिरिक्त सामान बाळगल्यास शुल्क आकारणी

विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा ट्रेन रद्द किंवा वेळेत बदल केले जातात. तसेच अनेकदा मार्गही बदलला जातो. बदलत्या हवामानामुळे, वादळी वारा, पावसामुळे अनेकद ट्रेन रद्द केल्या जातात. तर कधी, रेल्वे रुळांच्या देखभाल (Railway Divert) आणि दुरुस्तीसाठी रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात येतो.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCकडून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

दरम्यान, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आज १० जून रोजी १४१ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, १२ ट्रेन रिशेड्युल्ड करण्यात आल्या आहेत. रिशेड्युल्ड करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये 01040, 03298, 04133, 04685, 05053, 05509, 06616, 06921, 07971 , 12419, 14005 आणि 22638 या ट्रेन आहेत. तर, 14863, 14863, 14863, 14888, 14888 आणि 18022 या क्रमांकाच्या गाड्या डायवर्ट करण्यात आल्या आहेत.

रिशेड्युल्ड आणि डायवर्ट ट्रेन्स लिस्ट कशी चेक कराल?

  • enquiry.indianrail.gov.in/mntes/ या संकेतस्थळावर रद्द झालेल्या रेल्वेची माहिती देण्यात येते.
  • या संकेतस्थळावर Exceptional Trains असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला रद्द, रिशेड्युल्ड आणि डायवर्ट रेल्वेंची लिस्ट मिळेल, तिथे क्लिक करा.
  • ही लिस्ट चेक करूनच घराच्या बाहेर पडा.