रेल्वे प्रवासात अतिरिक्त सामान बाळगल्यास शुल्क आकारणी

तुम्हा रेल्वेने (Railway) प्रवास करत असाल आणि सामानाचे ओझे तुमच्याकडे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रेल्वे प्रवासात आता अतिरिक्त सामाना (Extra Luggage) बाळगल्यास शुल्क आकरला जाणार आहे.

72 hours jumbo mega block on Central Railway thane diva , 437 trains canceled, see full schedule

तुम्हा रेल्वेने (Railway) प्रवास करत असाल आणि सामानाचे ओझे तुमच्याकडे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रेल्वे प्रवासात आता अतिरिक्त सामान (Extra Luggage) बाळगल्यास शुल्क आकरला जाणार आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत सामान रेल्वे प्रवासादरम्यना बाळगल्यास शुल्क आकारावा लागत नाही. परंतु, आता विशिष्ट मर्यादेपेक्षा अतिरिक्त सामन प्रवासत नेल्यास शुल्क आकारला जाणार आहे. मात्र, रेल्वेच्या या निर्णयानंतर प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून, शुल्क आकारणीच्या नियमामुळे रेल्वेचा प्रवास महाग होणार असल्याचे मत प्रवाशांकडून मांडले जात आहे. (Indian railway clarification on extra luggage policy)

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने (Railway) मागील काही वर्षापूर्वी प्रवाशांच्या सामानाबाबत धोरण निश्चित केले होते. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे निर्धारित सामानाची मर्यादा सर्व प्रवाशांवर कायम असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. भारतीय रेल्वे मार्फत प्रवासादरम्यान विशिष्ट मर्यादेचं साहित्य निशुल्क सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. मात्र, त्याहून अधिक साहित्य बाळगल्यास विशिष्ट प्रकारचे शुल्क (Extra Charges) आकारले जाते.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCकडून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

विशिष्ट प्रकारची नियमावली

भारतीय रेल्वेनं सामान, साहित्य प्रवासात बाळगण्याबाबत विशिष्ट प्रकारची नियमावली आखली आहे. प्रवाशांना प्रवास करत असलेल्या कंम्पार्टमेंट नुसार सामानाची निश्चिती होती. त्यानुसार, सेकंड क्लाससाठी ३५ किलो, स्लीपरसाठी ४० किलो, थर्ड एसी/चेअर-कारसाठी ४० किलो, फर्स्ट क्लास(नॉन-एसी) करीता ५० किलो, फर्स्ट क्लास (एसी)साठी ७० किलो आणि रुग्ण तसेच दिव्यांग संबंधित वैद्यकीय उपकरणांवर सूट अशाप्रकारे सामान बाळगल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. परंतु यापेक्षा अधिक सामान रेल्वे प्रवासादरम्यान नेल्यास शुल्क आकारला जाईल.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर

रेल्वे प्रवासादरम्यान, स्टोव्ह, गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायन, फटाके याप्रकारचे सामान बाळगण्यावर कायद्यानं बंदी आहे. अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.


हेही वाचा – सैन्य दलातील दुसर्‍या रँकलाही सीडीएसचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारकडून नियमावलीत बदल