महाविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी होतील, मविआतील मतभेदांवर संजय राऊत म्हणाले…

राष्ट्रवादीकडून कोटा वाढवण्यात आला असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे बोलले जात होते परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज नाहीत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

shiv sena sanjay raut not appear ed money laundering case

राष्ट्रवादी काँग्रेसनं ऐनवेळी मतांच्या कोट्यात वाढ केल्यामुळे शिवसेनेच्या उमदेवार धोक्यात आला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमचे ४ उमेदवार निश्चित जिंकतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकशाहीत नवीन कोणी मालक निर्माण झाला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चार उमेदवार जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले की, सध्याकाळी ७ वाजता राज्यसभा निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार जिंकून येतील. हे उमेदवार पहिल्या फेरीमध्येच विजयी होतील असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीत चुरस ही फक्त हवा

राज्यसभा निवडणुकीमध्ये चुरस अशी भाजपकडून हवा निर्माण करण्यात आली. भाजपचे दोन उमेदवार विजयी होतील. या निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे वातावरण निर्माण करण्यात येत आहेत. परंतु हे चुकीचे आहे. भाजपकडून भ्रम निर्माण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे स्पष्ट दिसतील.

मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांशी चर्चा केली

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. बैठकीत ठरलेल्या गणितानुसार महाविकास आघाडीला मत मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतांच्या कोट्यात वाढ केल्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली असल्याचे संजय राऊत म्हणाले.  शरद पवारांनी ऐनवेळी मताचा कोटा ४२ वरून वाढवून ४४ केला आहे. महाविकास आघाडीकडे एकूण १६९ संख्याबळ आहे. परंतु राष्ट्रवादीकडून कोटा वाढवण्यात आला असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे बोलले जात होते परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज नाहीत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.


हेही वाचा : शरद पवारांनी ऐन वेळी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेचे टेन्शन वाढले