घरताज्या घडामोडीरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCकडून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCकडून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

Subscribe

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण IRCTCने रेल्वे तिकीट बुक करण्याच्या नियमात मोठे बदल केले आहेत. IRCTC वरून तिकीट बुक करणाऱ्यांना मोठी सुविधा मिळत आहे. मात्र, IRCTCच्या नव्या नियमानुसार आता प्रवासी एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकीटं बुक करू शकतात.

तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल

IRCTC ने एक नवीन नियम बनवला आहे, ज्या अंतर्गत जर तुम्ही तुमचे आधार कार्ड IRCTC शी लिंक केले असाल तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. तुम्ही एका महिन्यात १२ तिकिटं बुक करू शकत होता. मात्र, काही नियमांत बदल झाल्यामुळे आता तुम्ही एका आयडीने एका महिन्यात २४ तिकिटं बुक करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड IRCTC शी लिंक केले नसेल तरीही तुम्ही एका महिन्यात १२ तिकिटं बुक करू शकता.

- Advertisement -

कसे करावे आधार लिंक ?

1. यासाठी सर्वात पहिलं IRCTC च्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in वर भेट द्या.

2. त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

- Advertisement -

3. आता होम पेजवर दिसणार्‍या ‘My Account section’ वर जाऊन ‘Aadhaar KYC’ वर क्लिक करा.

4. यानंतर पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.

5. आता तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका आणि Verification करा.

6. आधारशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर खाली लिहिलेल्या ‘Verify’ वर क्लिक करा.

7. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की KYC तपशील यशस्वीरित्या अपडेट झाला आहे.


हेही वाचा : कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात ‘या’ 8 व्हायरसचा कहर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -