घरताज्या घडामोडीUnion Budget 2021 : जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार...

Union Budget 2021 : जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटी

Subscribe

यंदाच्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी ‘जल जीवन योजने’ची देखील घोषणा केली. जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना काळात उद्योगजगतात मोठे धक्के खावे लागत असताना देखील खेड्यांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेता सरकारने ही योजना सुरु केली असून आता शहरात देखील स्वच्छ पाणी मिळावे याकरता कोट्यावधींची तरतूद केल्याचे समोर आले आहे.

यासाठी सरकारचा प्रयत्न

देशात अजूनही अशी काही गावे आहेत ज्याठिकाणी अनेकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तर बऱ्याच ठिकाणी पाणी मिळत असून देखील ते पिण्यायोग्य नसते. त्यामुळे अनेकांना पायपिट करत विहीरीवर किंवा नदीवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ बसवण्यासाठी सरकार प्रयत्नात आहे.

- Advertisement -

६ कोटी लोकसंख्येला शुद्ध पाण्याचा पुरवठा

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल जीवन योजनेसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात पाहता एकूण खर्च काढला असता तो वाढून २३ हजार ५०० कोटींवर गेला आहे. यासाठी सरकारला अतिरिक्त रक्कमेचे वाटप करावे लागले. तसेच या योजनेअंतर्गत भारतातील २७८ लाख कुटुंबांमधील ६ कोटी लोकसंख्येला घरात शुद्ध पाणी देण्यात आले आहे.


हेही वाचा – union budget 2021: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा, कोट्यावधींची तरतूद

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -