घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा; कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची...

Union Budget 2021: आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा; कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी आज २०२१-२२ चा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर करत आहेत. कोरोना संकटादरम्यान सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रातील तरतूदीसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे दिसतेय. आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१ मध्ये, आरोग्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करताना आरोग्य सेवा क्षेत्राचे बजेट वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा केली. या योजनेत आगामी ६ वर्षांत ६४ हजार १८० कोटी रूपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोरोना लसींसाठी ३५ हजार कोटींची तरतूद असल्याची घोषणा देखील केली. आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतूदींमध्ये ३५ हजार कोटी रूपये हे कोरोना लसीकरणासाठी असणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी सरकारकडून अर्थसंकल्पात ९२ हजार कोटी रूपयांची आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद केली होती, मात्र यंदा या तरतूदीमध्ये १३७ टक्क्यांची वाढ केली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशातील नागरिकांचे निरोगी आरोग्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात ६९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनामुळे देशातील आरोग्य क्षेत्रावर बराच ताण पडला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात अनेक नव्या योजना आणि तरतूदी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

यासह देशात नव्या आरोग्य संस्था उभारण्यात येणार असून यंदा आरोग्य संस्थांना बळकटी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सरकारकडून १७ नवे पब्लिक हेल्थ यूनिट सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात येणार असून या ३२ एअरपोर्टवर देखील हे युनिट तयार केले जाणार आहे. देशात नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करणार असून त्यासोबतच ९ बायोलॅब उभारणीसाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

यासह आरोग्य क्षेत्रासाठी नॅशनल हेल्थ मिशनशिवाय अनेक तरतूदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी ७५ हजार ग्रामीण हेल्थ सेक्टरसह सर्वच जिल्ह्यात तपासणी आणि उपचार केंद्रांची व्यवस्था, ६०२ जिल्ह्यात क्रिटिकल केअर हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असून नॅशनल सेंटर फॉर डिजीस कंट्रोल आणि इंटिग्रेडेट हेल्थ इनफो पोर्टलवर देखील लक्ष केंद्रीत केली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्प सादर होत असताना करण्यात आली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -