घरताज्या घडामोडीAhmedabad Serial Blast Case: अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ दोषींना फाशीची शिक्षा

Ahmedabad Serial Blast Case: अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ दोषींना फाशीची शिक्षा

Subscribe

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणावर न्यायाधीश ए.आर.पटेल यांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर १० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील एकूण २० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या भयावह स्फोटामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४० लोकं जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. परंतु सुरतमध्ये देखील ४० ठिकाणी बॉम्ब प्लान्ट करण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे बॉम्बस्फोट झाला नव्हता. मात्र, संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्ह्यांवर एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. दरम्यान, या आरोपींविरोधात २६८ कलमाअंतर्गत हा खटला चालवला गेला होता. ज्यामद्ये फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मात्र, ४९ अतिरेकींपैकी ज्या ३८ जणांना अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आलं असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये १९९३ मध्ये देखील बॉम्बस्फोट हल्ला घडवून आणला होता. यामध्ये १०० हून अधिक आरोपींचा समावेश होता. परंतु त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात न्यायाधीश ए.आर.पटेल यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या प्रकरणी ५०० हून अधिक आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर सुनावणीदरम्यान सात पेक्षा जास्त न्यायाधीश बदलले होते. गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचं सांगितलं जातं. परंतु या हल्ल्यानंतर गुजरातचे तत्कालीने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणात सर्व दहशतवाद्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.


हेही वाचा : Video Viral : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी काढली रात्र, ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -