घरमनोरंजनप्रियांका चोप्रा ढोंगी; नेटकऱ्यांची टीका

प्रियांका चोप्रा ढोंगी; नेटकऱ्यांची टीका

Subscribe

प्रियांका चोप्राचे नुकतेच लग्न झाले असून तिच्या लग्नात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मात्र यामुळे प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. रणवीर सिंग- दीपिकाच्या लग्नानंतर आता देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस विवाहबद्ध झाले आहेत. बॉलिवूडमधलं हे बहुचर्चित लग्न असून जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा चांगलाच रंगला. या लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. या आतिषबाजीचे व्हिडीओ व्हायरल देखील झाले. त्यानंतर प्रियंका ट्रोल करण्यास सुरवात केली. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने आपण अस्थमाचे रुग्ण असल्याने धुरामुळे होणारा त्रास समजू शकतो. मात्र येत्या दिवाळीला प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश तिने दिला होता. मात्र स्वत:च्या लग्नात तिने धुमधडाक्यात फटाके फोडले त्यावरुन तिची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

वाचा – देसी गर्ल प्रियांका करणार ‘ख्रिश्चन’ वेडिंग?


नेटकऱ्यांनी केले ट्रोल

प्रियांका चोप्राने आपण अस्थमाची रुग्ण असल्याने मला धुराचा देखील त्रास होतो. मात्र धुरामुळे होणारा त्रास समजू शकतो. परंतु दिवाळी सणात फटाके फोडून प्रदूषण करु नका. यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करा अशा आशयाची एक जाहिरात केली होती. ही जाहिरात आता प्रियांकाला चांगलीच महागात पडली आहे. दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करा असे सांगितले गेले होते. मात्र हे सांगणारी प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात फटाके फोडत आहे. हे पाहून अनेकांनी तिच्या या कृतीची मनसोक्त खिल्ली उडवत तिने केलेल्या जाहिरातींची आठवण करुन दिली आहे. तसेच प्रियंका ढोंगी असे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच तिच्या जाहिरातीपासून मीम्स बनवत नेटकऱ्यांनी प्रियांकावर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

वाचा – प्रियांका-निकचाही होणार दोनदा रिसेप्शन सोहळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -