घरताज्या घडामोडीमुंबईच्या २६/११ हल्ल्यातील अजमल कसाबचा पत्ता नवाज शरीफांनी भारताला दिला, पाकच्या गृहमंत्र्यांचा...

मुंबईच्या २६/११ हल्ल्यातील अजमल कसाबचा पत्ता नवाज शरीफांनी भारताला दिला, पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप

Subscribe

पाकिस्तानात इमरान खान सरकारविरोधात अविश्वाच्या ठरावामुळे मोठी राजकीय अस्थिरता एकीकडे निर्माण झाली आहे. इमरान खान सरकारमधील घटक पक्ष असलेल्या एक्यूएमने विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे इमरान खान सरकारचे संकट वाढतानाच आता सरकार जवळपास पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण अशातच पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी असलेल्या अजमल कसाबच्या घरचा पत्ता हा भारताला नवाज शरीफ यांनी दिला असल्याचा आरोप पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी केला आहे. गृहमंत्री शेख राशिद यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा २६/११ हल्ल्यातील पाक कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानातील घडामोडींना वेग आला आहे. अविश्वासाच्या ठरावामुळे इमरान खान सरकारला झटका बसला आहे. त्यांनी एक्यूएमच्या खालिद मकबूल सिद्दीकी आणि BAP च्या खालिद मगसी यांना पत्र दाखवण्यासाठीचे आवाहन केले होते. पण या प्रस्तावाला दोन्ही पक्षांनी नकार दिला आहे. एक्यूएम आणि भाजप आता इमरान खान यांच्याविरोधात उभे राहिले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तान सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्या MQM चे सदस्य आणि कायदेमंत्री फारूग नसीम आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अमीन उल हकनेही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान इमरान खान हे पाकिस्तानच्या जनतेलाही संबोधित करणार आहेत. इमरान खान सरकारविरोधात आंतरराष्ट्रीय कटकारस्थान असल्याचाही उल्लेख या भाषणात होऊ शकतो. जे लोक इमरान खान यांच्याविरोधात मतदान करतील ते पाकिस्तान विरोधी आणि विरोधकांसोबत असल्याचाही दावा या भाषणात केला जाऊ शकतो.

पाकिस्तानच्या संसदेत ३४२ सदस्यांची एकुण क्षमता आहे. त्यामध्ये १५५ सदस्य इमरान खान यांच्या पक्षासोबत आहेत. तर सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी १७२ सदस्यांची गरज आहे. याआधी ८ मार्चला संसदेच्या सचिवालयाला विरोधकांनी अविश्वासाच्या ठरावाची नोटीस दिली होती. त्यानंतर अविश्वासाचा ठराव हा विरोधकांकडून मांडण्यात आला होता.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -