घरदेश-विदेशआज कारगिल विजय दिवस

आज कारगिल विजय दिवस

Subscribe

२६ जुलै हा कारगिल दिवस म्हणून ओळखला जातो. आज कारगिल विजयाला १९ वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला सळो की पळो सोडत घुसखोरी केलेल्या पाक सैन्याला पळवून लावले होते.

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युध्दाला आज १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांकरता अभिमानाचा दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी करत पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. हे युद्ध दोन ते तीन महिने चालले. या युद्धामध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले आहेत. तर १३००० पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते. मात्र त्यांच्यापैकी एक म्हणजे निवृत्त जवान दिगेंद्र सिंह हे आहेत. या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी हुसकावून लावत कारगिलवर विजय मिळवला होता.

काय होते कारगिल युद्ध?

२६ जुलै हा दिवस कारगिल विजयचा दिवस मानला जातो. या दिवशी १९९९ साली आपल्या देशाने पाकिस्तानी सैन्याला हुसकावून आपला विजय मिळवला होता. म्हणून हा कारगिल विजयाचा दिवस मानला जातो. जम्मू – काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक येथे लढल्या गेलेल्या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन करत विजय मोहिम राबून शत्रूला पळून लावले.

- Advertisement -
digendra-singh
दिगेंद्र सिंह यांना राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते महावीर चक्र प्रदान

दिगेंद्र सिंह यांच्याविषयी…

या युद्धामध्ये देशाने अनेक वीर गमावले मात्र त्यांच्यापैकीच एक म्हणजे दिगेंद्र सिंह हे आहेत. ते आता निवृत्त झाले आहेत. हे राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी. त्यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. या युद्धात दिगेंद्र सिंह यांना तब्बल पाच गोळ्या लागल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत देखील ते जिद्दीने लढत त्यांनी पाकिस्तानच्या तब्बल ४८ जवान आणि घुसखोरांना ठार केले होते. कारगिल समाप्तीनंतर दिगेंद्र सिंह यांना राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

- Advertisement -

(सौ. ANI)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -