घरदेश-विदेशदिल्ली परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

दिल्ली परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Subscribe

दिल्लीमधील एनसीआर परिसरातमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.

दिल्लीमधील एनसीआर परिसरातमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेल्याचे भूगर्भ विभागाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणा येथे असल्याचे सांगितले आहे. साधारणत: साडे चारच्या आसपास एनसीआर परिसर हादरायला लागला. स्थानिक नागरिक जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर सरावैरा पळू लागले. हे कसले हादरे होते कोणालाच कळले नाही. अखेर हे हादरे भूकंपाचे असल्याचे नंतर लक्षात आले. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठी हानी टळलेली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करुन भूंकपाबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -