घरदेश-विदेशभाजप २०१९ जिंकेल आणि पुढची ५० वर्ष सत्ता राखेल! - अमित शाह

भाजप २०१९ जिंकेल आणि पुढची ५० वर्ष सत्ता राखेल! – अमित शाह

Subscribe

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

भाजप २०१९ सालची निवडणूक जिंकेलच त्याशिवाय पुढची ५० वर्षे भाजप भारतावर सत्ता गाजवेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली येथे भाजप पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु असून आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भाषणे झाली. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीतले मुद्दे सांगितले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवी घोषणा भाजपने दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, “अटलजींनी भाजपला विचार, संस्कार आणि नेतृत्वाला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आज आपला सुर्य जरी आपल्यात नसला तरी आपण तारे बनून विचारधारेचा प्रकाश पुढे नेऊया.”

- Advertisement -

भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, विरोधक कितीही आरोप करत असले तरी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर चालत रहायचे आहे. अजय भारत, अटल भारत या नव्या घोषवाक्याने मागच्यावेळेपेक्षाही मोठा विजय आपल्याला मिळवायचा आहे.

- Advertisement -

 

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाआघाडीचे वर्णन तीन शब्दात केले आहे. “नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती नाही आणि नियत भ्रष्ट” काँग्रेस कर्नाटक निवडणुकीनंतर देशात महाआघाडी स्थापन्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी महाआघाडीवर टीका करुन त्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -