घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

ट्रकमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यात आपल्या मुळ घरी जात असलेल्या मजुरांच्या ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पानवाडी पोलीस स्टेशन परिसरातील झाशी-मिर्झापूर महामार्गाच्या महुआ वळणावर हा अपघात झाला.

यापूर्वी शनिवारी औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक अपघात झाला होता. या अपघातात सुमारे २५ स्थलांतरित कामगार ठार झाले आणि ३० हून अधिक लोक जखमी झाले. तर मध्यप्रदेशातील सागर जिह्यात एक ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच मजुरांचा मृत्यू झाला तर जवळपास २० जण जखमी झाले. यासह गुरुवारी १४ मेला मध्य प्रदेशातील गुना येथे मजुरांच्या गाडीचा अपघात झाला. कंटेनर आणि बसच्या भीषण अपघात ८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय, जालना – औरंगाबाद मार्गावर करमाजवळ २० मजूरांवरुन मालगाडी गेली. या दुर्घटनेत १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; निगेटिव्ह व्यक्तीला ठेवलं कोरोना वार्डमध्ये


कुशीनगर दुर्घटनेत १२ मजूर जखमी

यूपीच्या कुशीनगरमध्ये प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या बस अपघातात १२ प्रवासी कामगार जखमी झाले. सोमवारी एनएच-२८ वर शाही पेट्रोल पंपाजवळ बिहारकडे जाणाऱ्या एका बसने कांद्याने भरलेल्या ट्रकला धडक दिली. स्थानिक नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून तामकुही सीएचसीमध्ये दाखल केलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -