घरदेश-विदेशगुलाम नबी आझाद यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या 'या' 5 नेत्यांनी सोडला पक्ष

गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या ‘या’ 5 नेत्यांनी सोडला पक्ष

Subscribe

नवी दिल्ली – जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्याराजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. राजीनामा दिल्यानंतर आझाद आपला पक्ष स्थापन असल्याचे त्यांनी सांगीतले.  त्यांच्या समर्थनार्थ काश्मीर मधील 5 काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

या 5 नेत्यांनी दिला राजनामा –

- Advertisement -

जीएम सरूरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट्ट, गिलजार अहमद वानी आणि चौधरी मोहम्मद अकरम अशी काँग्रेसच्या 5 नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे.

गुलाम नबी आझाद काय म्हणाले –

- Advertisement -

राजीनामा दिल्यानंतर आझाद भाजप मध्ये प्रवेश करतील, असा अंदाज लावला जात होता. पण त्यांनी स्पष्ट केले की, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. गेल्या 3 वर्षापासून विरोधी पक्षातील काही लोकांनी अफावा उठवल्या होत्या की मी भाजप मध्ये प्रवेश करणार आणि मला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवणार. मात्र, तसे काही नाही. मी काश्मीर मध्ये जाणार आणि नवा पक्ष काढणार आहे. लवकरच आम्ही राष्ट्रीय स्तरावर दिसू, असे अझाद म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -