घरदेश-विदेशट्रकच्या भीषण अपघातात ५ मजूरांचा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

ट्रकच्या भीषण अपघातात ५ मजूरांचा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Subscribe

आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमध्ये सर्वांचेच नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासाच्या सुविधा बंद आहेत. विशेषतः राज्यांबरोबरच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याने कामगार, मजूर आपलं घर गाठण्यासाठी चालत प्रवास करताना दिसताय. या लॉकडाऊनदरम्यान कामगार घरी परतत असताना मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळ रस्त्यात भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळ असलेल्या पाथा गावाजवळ एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघातात झाला. आंब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये १८ मजूर होते. हा ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता. दरम्यान, पाथाजवळ ट्रक उलटला. यात ५ मजूर जागीच ठार झाले. ११ मजूर गंभीर झाले आहेत. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

- Advertisement -

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणखी एका घटनेत ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला असून या भीषण अपघातात ५ मजूर जागीच ठार झाले, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ हा अपघात घडला.


कांदिवलीत अचानक घर कोसळले, १४ जणांची सुटका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -