घरदेश-विदेशया वयातही 'ते' घोड्यापेक्षा चपळ; पाहा अनोखी शर्यत

या वयातही ‘ते’ घोड्यापेक्षा चपळ; पाहा अनोखी शर्यत

Subscribe

वयाच्या ६६ व्या वर्षीही ते आपल्या घोड्यासोबत दररोज २ किलोमीटरची शर्यत लावतात.

साधारण वयाची चाळीशी उलटली की काही ना काही दुखणी डोकं वर काढू लागतात. सर्वसामान्य माणसांना चाळीशीनंतर गुडघेदुखी, चष्मा लागणं अशा प्रकराच्या समस्या सतावू लागतात. वयाची साठी उलटल्यानंतर तर बहुतांशी माणसं सांधेदुखी, ब्लडप्रेशर, थकवा, श्वसनाचे त्रास अशा कुठल्या ना कुठल्या समस्यांनी ग्रासलेली हमखास पाहायला मिळतात. मात्र, जगात यालाही अपवाद आहेत. आजही दुनियेत अशी अनेक माणसं आहेत जी वयाची ६० वर्ष उलटूनही निरोगी आणि धडधाकट आहे. आजही त्यांच्यामध्ये तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि जोश आहे. अशाच काही लोकांपैकी एक आहेत जालंधर येथे राहणारे बलवंत सिंग. सिंग यांचं वय ६६ वर्षं असून या वयातही त्यांचा फिटनेस कमालीचा आहे. सिंग आजोबा दररोज एका घोड्याशी शर्यत लावतात. ही शर्यत जवळपास २ किलोमीटर अंतरापर्यंत चालते. या अनोख्या शर्यतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सिंग आजोबा आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले
आहे.

सलाम त्यांच्या जिद्दीला 

उपलब्ध माहितीनुसार, सिंग आजोबांना ते लहान असल्यापासूनच शर्यतीची आवड होती. चपळाई आणि तंदुरुस्ती हे नेहमीच त्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचे घटक राहिले आहेत. शर्यतीची प्रचंड आवड असलेले सिंग लहानपणी ससा आणि कुत्र्यासोबत शर्यत करत असत. पुढे पुढे त्यांचं हे शर्यतीचं वेड वाढत गेलं आणि आणि या शर्यतीमुळेच ते नावारुपाला आहे. त्यांनी आजवर शर्यतीमध्ये शंभरपेक्षाही अधिक पदकं, चषकं आणि प्रमाणपत्रं पटकावली आहेत. आज ६६ वर्षांचे होऊनही सिंग आजोबा इतके फिट आहेत, की ते आपल्या गावापासून ३१ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरदासपूरपर्यंत धावत दीड तासात पोहोचतात. त्यांच्यासोबत शर्यत करण्यासाठी विशेष ट्रेन करण्यात आलेल्या घोड्याचं नावही ‘बलवंत’ असं ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

सिंग यांना लहानपणी कब्बडी खेळाचीही आवड होती. मात्र, पंजाबात दगशतवादाचं लोण पसरल्यानंतर त्यांचा खेळ मागे पडला. त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष पुन्हा एकदा धावण्यावर आणि शर्यतीवर केंद्रित केलं. काही दिवसांपूर्वी अटारी बॉर्डरवर सीमा सुरक्षा दलाने एक शर्यत आयोजित केली होती, ज्यामध्ये सिंग यांनी पहिलं स्थान पटकावलं होतं. बलवंत सिंग यांच्या फिटनेसला आणि त्यांच्या जिद्दीला देशभरातून लोक दाद देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -