घरताज्या घडामोडीबीएसएफच्या ६७ जवानांना कोरोनाची लागण

बीएसएफच्या ६७ जवानांना कोरोनाची लागण

Subscribe

बीएसएफच्या ६७ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारताच्या निमलष्करी दलामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी ३ मे रोजी सीआरपीएफमध्ये १३५ कोरोनाबाधीत आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आता सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अर्थात बीएसएफच्या ६७ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील सार्वधिक रुग्ण हे दिल्लीत आढळून आले असून दिल्लीत बीएसएफच्या १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोलकतामध्ये एका जवानाला कोरोनाचीबाधा झाली आहे. या व्यतिरिक्त त्रिपुरा येथील बीएसएफच्या कॉलनीत २५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता बीएसएफच्या दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सीमा बलमध्ये (SSB) १३ कोरोनाबाधित

दरम्यान, दिल्लीत जामा मशिद आणि चांदनी महल याठिकाणी बीएसएफच्या १२६ व्या बटालियनचे जवान तैनात होते. या बटालियनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तर सशस्त्र सीमा बलमध्ये (SSB) १३ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर रविवारी ३ मे रोजी सीआरपीएफमध्ये १३५ कोरोनाबाधीत आढळले. त्यामुळे सीआरपीएफचे मुख्यालय सील करण्यात आले. तसेच सीआरपीएफच्या सर्व जिल्हा कार्यालयांना त्यांच्या अधिकारात निर्णय घेण्यासाठी मर्यादीत स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे

सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. एकीकडे देशाच्या सीमावर्ती भागांमधली घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचा सामना सुरु असताना कोरोना संकटाने आणखी मोठा धक्का दिला आहे. मात्र, या कोरोना विषाणूचा आम्ही सामना करु आणि संकटातून बाहेर प़डू, असा विश्वास देण्यात आला आहे. तसेच कोरोना संकट वाढत असल्यामुळे जवानांना काळजी घेण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. आरोग्याची काळजी घ्यायला सांगितली जात आहे. जवानांना अनोळखी व्यक्तींशी बोलताना मास्क लावण्याची तसेच सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच क्वारंटाईन केलेल्या जवानांनी डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही सर्व जवानांना वरिष्ठांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -