घरदेश-विदेशफरार मेहुल चोक्सीला झटका, डोमिनिका कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

फरार मेहुल चोक्सीला झटका, डोमिनिका कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

4डोमिनिका जेलमध्ये अटकेत असलेला फरार मेहुल चोक्सीला डोमिनिका न्यायालयाने दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अवैध मार्गाने देशात प्रवेश केल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी वरीष्ठ न्यायालयात जाऊ असं सांगितलं आहे. याशिवाय, न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळताना सुनावणी स्थगित केली आहे. गेल्या आठवड्यात मेहुल चोक्सीला अटक झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केला होती. अँटिग्वालमधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान वकिलांनी मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा केला आहे. तसंच मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही म्हटलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -