घरदेश-विदेशधक्कादायक! तरूणाने आई-वडिलांसह ६ नातेवाईकांना मारले ठार!

धक्कादायक! तरूणाने आई-वडिलांसह ६ नातेवाईकांना मारले ठार!

Subscribe

पोलीस आरोपीची चौकशी करत असून हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे

लखनऊमध्ये गुरुवारी एका तरूणाने धारदार शस्त्राने त्याच्या आई-वडिलांना, भावासह त्याच्या पत्नीला आणि दोन मुलांना ठार केले. आपल्याच माणसांना ठार मारल्यानंतर आरोपी स्वत: पोलिसांकडे गेला आणि त्याने खून केल्याचे आत्मसमर्पण केले. कुटुंबातील मालमत्तेच्या वादावरून ही घटना घडली असून हे या हत्येमागील कारण असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रकरण लखनऊच्या बंथरा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. दरम्यान पोलीस आरोपीची चौकशी करत असून हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

असा घडला प्रकार

ही घटना बंथरा पोलिस स्टेशन परिसरातील गोदौली या गावची असून अजय सिंह असे आरोपीचे नाव आहे. अजय सिंहला आपल्या कुटुंबाने जमीन विकल्याचा संशय आला मात्र, त्याला त्याबद्दलचा वाटा देण्यात आला नाही असा त्याचा गैरसमज झाला. यावेळी त्याचा कुटुंबियांशी वाद-विवाद झाला परंतु, त्याच्या बोलण्याकडे कुटुंबाने लक्ष दिले नाही.

- Advertisement -

सर्व प्रकाराबद्दल त्याने केले आत्मसमर्पण

आरोपी अजयचे वडील अमर सिंह शेतात गेले होते. अजयही तिथे पोहोचला आणि तिथेच त्याने वडिलांची हत्या केली. यानंतर तो दुचाकीवरून घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर त्याने त्याच्या अरुण नावाच्या भावाला देखील ठार मारले. अरूणची सुटका करण्यासाठी त्याची आई आणि अरुणची पत्नी आली होती मात्र त्यांचा देखील अजयने जीव घेतला. इतकेच नाही तर यामध्ये 9 वर्षाचा पुतण्या सौरभ आणि 2 वर्षाची पुतणी सारिका या दोघांना देखील त्याने जिवंत सोडले नाही. या घडलेल्या प्रकारानंतर थोड्या वेळाने अजय आपल्या अविनाश या मुलासह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि सर्व प्रकाराबद्दल त्याने आत्मसमर्पण केले. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


दोन लग्न करणं पडलं महागात, दुसऱ्या बायकोला द्यावे लागणार ६० लाख रूपये!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -