घरताज्या घडामोडीCoronaVirus: रॅपिड टेस्टिंग किट्स आयात करणाऱ्या दोन कंपन्यांवर मोठी कारवाई

CoronaVirus: रॅपिड टेस्टिंग किट्स आयात करणाऱ्या दोन कंपन्यांवर मोठी कारवाई

Subscribe

रॅपिड अँडीबॉडी टेस्टिंग किट आयात करणाऱ्या दोन कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाने चीनमध्ये गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्स तयार केलेली रॅपीड अँटीबॉडी टेस्टिंग किट आयात करणाऱ्या दोन कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. सीडीएससीओने आयसीएमआरच्या आधारे आयातीचे कारण देत नोटीस बजावली असून त्वरित रॅपिड अँडीबॉडी टेस्टिंग किट्सचे आयात थांबवण्यास सांगितले आहे. एक वरिष्ठ सरकारी वकील म्हणाले की, चीनमध्ये गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्सद्वारे तयार केलेले कोविड-१९ रॅपिड अँडीबॉडी टेस्टिंग किट आयात केलेल्या त्या दोन कंपनीचे सीडीएससीओने परवाने रद्द केले आहेत.

२८ एप्रिलला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR)ने राज्यांना दोन चीनी कंपन्यांकडून खरेदी केलेल्या कोविड-१९ रॅपिड अँडीबॉडी टेस्टिंग किटचा वापर थांबवून ते परत कंपन्यांना पाठवावेत, असे सांगितले होते.

- Advertisement -

सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी सल्लामसलत करताना आयसीएमआरने म्हटले की, गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्सच्या किटचे परिक्षण केले आहे. त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आल्या. किटची गुणवत्ता तपासानूच निर्यात केले होते. मात्र गुणवत्ता चांगली नसल्याचे समोर आल्यामुळे रॅपिट अँटीबॉडी टेस्टिंग किटची निर्यात थांबवण्यात आली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: चीनसाठी WHO ही जनसंपर्क संस्था, लाज वाटली पाहिजे स्वतःची – ट्रम्प

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -