घरदेश-विदेशगर्भवती महिलेचा पाय घसरला, बाळाचा पोटातच मृत्यू, तिला ९ वर्षाची शिक्षा

गर्भवती महिलेचा पाय घसरला, बाळाचा पोटातच मृत्यू, तिला ९ वर्षाची शिक्षा

Subscribe

एका दुर्घटनेत पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याने २९ वर्षीय महिलेला तब्बल ९ वर्षे तुरुंगावासाची शिक्षा भोगावी लागली आहे. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या महिलेने गर्भपातासंबंधीत अत्यंत कठोर कायद्यात बदल करावा अशी विनवणी सरकाराला केली आहे. जेणेकरुन तिच्याप्रमाणे इतर महिलांना या परिस्थितीचा सामना करावा लागू नये. सारा रोगेल गार्सिया नामक असे शिक्षा भोगून आलेल्या महिलेचे नाव आहे.

सारा रोगेल गार्सिया २०१२ मध्ये गर्भवती राहिली. गर्भवती असतानाही ती घरातील कपडे आणि इतर कामे करायची. मात्र याचदरम्यान एकेदिवशी कपडे धुवत असताना साराचा पाय घसरला आणि ती जोरदार खाली आपटली. यामुळे ती बेशुद्ध झाली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिचे हात पलंगाला बांधले होते. चार दिवसानंतरही ती या दुखापतीतून सावरु शकली नाही, अशातच तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिला तुरुंगावासाची शिक्षा भोगावी लागली.

- Advertisement -

या दुर्घटनेप्रकरणी सारा रोजेल गार्सियाला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र आता ही शिक्षा ९ वर्षांवर आली आहे. गेल्या महिन्यातच सारा जामिनावर बाहेर आली. यावर बोलताना सारा सांगते, आम्ही महिलांनाही जगण्याचा हक्क आहे. माझ्याबरोबर जे घडले तो एक अपघात होता, त्यात माझा दोष नव्हता. एल साल्वाडोर देशात गर्भपाताबाबत बरेच कठोर कायदे आहेत. यामुळे गर्भपात झाल्यास किंवा एखाद्या महिलेस गर्भपातासारख्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास तिच्याकडे मोठ्या संशयाने पाहिले जाते.

रोगेलला जरी जामीन मिळाला असला तरी अशा अनेक स्त्रीया आहेत ज्यांना अशाप्रकारच्या आरोपाखाली तुरूंगात जावे लागले आहे. अशा परिस्थिती बरेच डॉक्टर शिक्षेच्या भीतीने अनेक गुंतागुंत असलेल्या गर्भधारणेसंबंधीत प्रकरणांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. असे मत महिला हक्क आयोगाच्या संचालिका मोरेना हेरेरा यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

एक्टोपिक गर्भधारणा गर्भवती स्त्रियांसाठी खूप क्लिष्ट मानली जाते. यात मृत्यूचा धोका अधिक असतो. एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे महिलांना कडक शिक्षा केली जाते हे जगातील इतर कोठेही नाही पण अल साल्वाडोरमध्ये यासंदर्भात कायदा आहे. ९ वर्षांची शिक्षा भोगून सारा तिच्या घरी परतली असून आता आपल्या कुटुंबासमवेत आनंदात वेळ घालवत आहे. यावर सारा सांगते की, मला आयुष्यात प्रेरणा मिळाली आहे. मला माझ्या घरातील सदस्यांसह जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे आणि या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे.

तसेच माझ्यासारख्या शिक्षा भोगून आलेल्या महिलांना मदत करायची आहे, मी तुरूंगात असताना तेथील अनेक महिलांना वचन दिले आहे की, जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा मी तुलाही बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जसे मला आयुष्यात जगण्याची नवी संधी मिळाली तशीच संधी तुम्हालाही मिळाली पाहिजे असे मत साराने व्यक्त केले.


उत्तर भारतात वीज कोसळल्याने ६८ जणांचा मृत्यू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -