घरदेश-विदेशअरविंद केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन आहे, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा 'आप'वर हल्लाबोल

अरविंद केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन आहे, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा ‘आप’वर हल्लाबोल

Subscribe

संबित पात्रा यांनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टी आणि खासदार अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे

दिवाळीनंतर दिल्लीत दरवर्षी वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे जगणे अवघड होत आहे. दिल्ली, एनसीआर शहरांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर पोहचला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आरोग्यासंबंधीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता नोएडा, ग्रेट नोएडा आणि आता दिल्लीतही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील या घातक प्रदुषणावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजप नेत्यांकडून हल्लाबोल केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे फक्त पोल्यूशन आहे, सोल्यूशन नाही, म्हणत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि मनोज तिवारी यांनी ‘आप’वर टीका केली आहे. संबित पात्रा आणि मनोज तिवारी हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. (aap has pollution only no solution bjp attackts arvind kejriwal on delhi pollution)

दिल्ली सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळतेय. यात केजरीवाल हे दिल्लीचे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत, म्हणत संबित पात्रा यांनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टी आणि खासदार अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

संबित पात्रा पुढे म्हणाले की, आम्ही आज एक मोठी गोष्ट सांगणार आहोत, दिल्ली सरकार कामगार मंत्रालयाद्वारे 10 लाख नोंदणीकृत कामगारांपैकी 2 लाख कामगार बनावट असल्याचे आढळले. यातील 4 – 5 कामगारांची एकाच क्रमांकावर नोंदण दिसली. अशाप्रकारे बनावट नोंदणी करत पैसा उकळण्यात आला आणि या कामगारांच्या पैशांनी पक्षाचा खर्च काढण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे या खात्याचे प्रभारी आहेत. केजरीवाल यांचा हेतू स्वच्छ नाही. अरविंद केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा आणि हेतू दुषित आहे. दिल्ली भ्रष्टाच्या प्रदुषणाचा सामना करत आहे.

संबित पात्रा म्हणाले की, दिल्लीच्या बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या तीन गैर सरकारी संघटनांनी दिल्लीतील कामगारांच्या नोंदणीत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच तपासातही दिल्लीत दोन लाख बनावट कामगारांची नोंद झाल्याचे दिसते. तसेच 65,000 कामगारांच्या नावावर एकचं मोबाईल नंबर रजिस्टर असल्याचेही दिसले.


हेही वाचा : मुंबईतील सर जे जे रुग्णायालात सापडले ब्रिटिशकालीन भुयार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -