घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्यात 'नैसर्गिक शेती मिशन' राबवणार

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबवणार

Subscribe

वैज्ञानिक दृष्टीने नैसर्गिक शेती केली जातेय. शेतकरी आपल्या शेतीकरता आवश्यक गोष्टी स्वतःच तयार करेल, बाहेरून काहीही आणणार नाही. यामुळे उत्पादकता वाढेल. त्यामुळे नैसर्गिक शेतीचं काम राज्यात सुरू करणरा आहोत. यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळेल.

सोलापूर – मागच्या टर्ममध्ये गुजरातच्या राज्यपालांना (Gujarat Governor) पुण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यांनी नैसर्गिक शेतीचं मॉड्युल (Natural Farm Module) तयार केलं आहे. या मॉड्युलनुसार राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण (Natural Farm Training) देण्यात आलं. गुजरातच्या राज्यपालांनी नैसर्गिक शेतीच्या जोरावर जास्त उत्पादन घेतलं आहे. हे नैसर्गिक शेतीचं मिशन (Natural Farm Mission) आता राज्यातही राबवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra DCM Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते सोलापुरातील मंगळवेढा येथे बोलत होते. (Natural Farm Mission in Maharashtra)

हेही वाचा …म्हणून मुख्यमंत्र्यांना सीमाभागातील काळ्या दिनाचे सोईस्कर विस्मरण, ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आपण एकरी टनेज उसाचं उत्पादन घेतो. पण गुजरातमध्ये कोणतंही केमिकल फर्टिलायजर न वापरता तिप्पट उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. वैज्ञानिक दृष्टीने नैसर्गिक शेती केली जातेय. शेतकरी आपल्या शेतीकरता आवश्यक गोष्टी स्वतःच तयार करेल, बाहेरून काहीही आणणार नाही. यामुळे उत्पादकता वाढेल. त्यामुळे नैसर्गिक शेतीचं काम राज्यात सुरू करणरा आहोत. यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळेल.’

मागच्या काळात २४ गावांना पाणी देणारी मंगळवेढा योजना आपण आणली. मात्र माझं सरकार गेलं. पण मी बोललो होतो की मी पुन्हा येईन. मधल्या सरकारने फाईल पुढे ढकललीच नाही. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, पांडुरंगाच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं. सरकार आल्याबरोबर या योजनेला गती मिळाली आहे. या योजनेसाठी समाधान दादांनी चांगला पाठपुरावा केला. या योजनेसंदर्भातील सर्व मान्यता घेतल्या आहेत. ठराव झाले आहेत. एस्टिमेट तयार झालंय, पण ते २०७-१८ च्या दरसूचीवर तयार झाले आहेत. आता लोखंडाचे भाव वाढले, पाईपचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नियोजन विभागाने त्यात लिहिलंय की नवीन दर सूचीप्रमाणे प्राकलन तयार करावं. या प्रकल्पाला मान्यता आहे, पण नवीन दराने प्राकलन आल्यानंतर कॅबिनेटमध्ये या योजनेला मान्यता मिळेल. यामुळे २४ गावांना पाणी पुरवठा करणारी मंगळवेढा योजना सुरू होईल, अशीही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी आज केली.

- Advertisement -

हेही वाचा – विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्मारक तयार करणार

जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी जागेचे प्रश्न सोडवले. यासाठी १५१ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आणला होता. मात्र मागच्यावेळी आमचं सरकार गेलं, त्यामुळे प्रस्ताव थंड्या बस्त्यात गेला. पण आता मी आलो आहे, त्यामुळे आता थंड्या बस्त्यातून प्रकल्प बाहेर आला. आता हा प्रकल्प होणार आहे. तसंच, संत चोखामेळा स्मारकासाठी निधीही दिला होता. पण तो निधी वापरला नाही. पण आता हे स्मारकही लवकरच होईल, असंही आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -