Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश त्याच ठिकाणी पुन्हा भयंकर अपघात; ऋषभ पंतनंतर अजून चौघे जखमी

त्याच ठिकाणी पुन्हा भयंकर अपघात; ऋषभ पंतनंतर अजून चौघे जखमी

Subscribe

उत्तराखंडः क्रिकेटपटू ऋषभ पंतचा गेल्या वर्षी ज्या ठिकाणी अपघात झाला तेथेच एका कारचा बुधवारी अपघात झाला. ट्रॉली आणि ट्रैक्टरला ओव्हर टेक करताना हा अपघात झाला. या अपघातात कारमधील चारही जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी येथील नारसन भागात हा अपघात झाला. या भागात वाहतूक सुरळीत सुरु होती. त्याचवेळी अपघात झालेली कार वेगाने पुढे आली. ट्रॉली आणि ट्रैक्टरला ओव्हर टेक करत असतात ती कार महामार्गाच्या दुभाजकाला जोरात धडकली. ही कार इतक्या वेगाने धडकली की जागीच पलटी होऊन फरफटत गेली. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असे बोलले जात आहे. मात्र या अपघातात कारमधील चारही जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. हे चारही जण नोएडा येथील आहेत. साहिल, सावन, प्राची गौतम आणि श्रुती अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला याच ठिकाणी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्ली-देहरादून एक्स्प्रेस वेवर हा अपघात घडला. पंत स्वत: ही कार चालवत होता. डोळ्यावर झापड आल्याने पंतचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वेगाने दुभाजकाला धडकली. अपघातानंतर पंतच्या कारने पेट घेतला व काही क्षणातच कार जळून खाक झाली, मात्र त्यापूर्वीच कारची काच फोडून स्थानिकांनी पंतला कारमधून कसेबसे बाहेर काढले. या अपघातात पंतच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या पायालाही फ्रॅक्चर झाले. पंतवर देहरादूनमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ऋषभला पुढील उपचारांसाठी मुंबईत आणले गेले. मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऋषभ हा वेगाने कार चालवत होता. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. ऋषभची प्रकृती आता ठिक आहे. मात्र तो पुढील काही दिवस खेळू शकणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -