घरदेश-विदेशAfghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच; 4 बॉम्बस्फोट, 18 ठार, अनेक...

Afghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच; 4 बॉम्बस्फोट, 18 ठार, अनेक जखमी

Subscribe

Afghanistan Mazar e Sharif Blast : अफगाणिस्तानमधील मजार- ए- शरीफ येथील शिया मशिदीत गुरुवारी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुज येथेही स्फोट झाले आहेत. यामुळे अफगाणिस्तान 4 स्फोटांनी हादरले आहे. दरम्यान या स्फोटातील जखमींना तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मजार-ए-शरीफचा तालिबानी कमांडर मोहम्मद आसिफ वजीरी यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा क्रमांक दोनमधील शिया मशिदीत स्फोट झाला असून यात 18 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत तर अनेक जखमी झालेत.

पश्चिम काबूलमधील शिया हजारा भागातील एका शाळेत बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर दोन दिवसांनी हा स्फोट झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यात असलेल्या शिया समुदायाला इस्लामिक स्टेटसह सुन्नी अतिरेकी गटांकडून सातत्याने लक्ष्य केले जातेय.

- Advertisement -

दरम्यान मजार-ए-शरीफ येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, ती जवळच्या परिसरात तिच्या बहिणीसोबत खरेदीसाठी गेली होती. तेव्हा तिला स्फोटाचा भीषण आवाज आला आणि मशिदीतून धूर निघू लागला, स्फोटाच्या आवाजाने दुकानांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच बाजारपेठेत चेंगराचेंगरीची घटना झाली.


Palm Oil Price Hike : ‘या’ देशात पाम तेल प्रति लीटर 22 हजार रुपये; हे आहे कारण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -