घरदेश-विदेश१४ वर्षांनंतर वाढणार माचिस बॉक्सची किंमत, एका बॉक्समागे मोजावे लागणार...

१४ वर्षांनंतर वाढणार माचिस बॉक्सची किंमत, एका बॉक्समागे मोजावे लागणार…

Subscribe

तब्बल १४ वर्षानंतर सर्व सामान्यांच्या खिशाला एका गोष्टीमुळे हलका होणार आहे. ती गोष्ट म्हणजे माचिस. आता १४ वर्षानंतर देशात माचिसच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे माचिससाठी आता १ रुपयांऐवजी २ रुपये मोजावे लागणार आहेत. माचिसच्या वाढलेल्या किंमती १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. कच्चा मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होतेय त्यामुळे माचिस तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी १ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ग्राहकांनी ३६ काड्या मिळायच्या. मात्र आता २ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ३६ माचिसच्या काड्यांऐवजी ५० काड्या मिळतील. नॅशनल स्मॉल मॅचेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही.एस. सेथुराथिनम यांनी सांगितले की, “प्रस्तावित दरवाढ १४ वर्षांनंतर करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे विक्री (कमाल किरकोळ किंमत) किंमत वाढविण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.”

- Advertisement -

सर्व १४ प्रमुख कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सेथुराथिनम यांनी सांगितले. “एक किलो रेड फॉस्फरसचा दर ४१० रुपयांवरून ८५० रुपयांवर पोहचला आहे. तर मेणाची किंमत ७२ रुपयांवरून ८५ रुपये झाली आहे. पोटॅशियम क्लोरेट ६८ रुपयांवरून ८० रुपये, स्प्लिंट्स ४२ रुपयांवरून ४८ रुपये झाले आहे. बाहेरील बॉक्स ४२ रुपयांवरून ५५ रुपये आणि आतील बॉक्स ३८ रुपयांवरून ४८ रुपयांवर पोहचला आहे. अशा प्रकारे सर्व कच्च्या मालाची किंमत अनेक पटींनी वाढली आहे.”

ते म्हणाले की, “इंधनाच्या दरात झालेली वाढ हेही माचिसच्या किंमती वाढण्यामागे एक कारण आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून माचिसची किंमत सध्याच्या १ रुपयावरून २ रुपये (एमआरपी) होणार आहे. सुमारे सहा महिन्यांनंतर आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो. २००७ मध्ये एका माचिस बॉक्सची किंमत पन्नास पैशांवरून १ रुपये प्रति माचिक बॉक्स करण्यात आली होती. यात आता माचिसच्या काड्यांची संख्या ३६ वरून ५० पर्यंत वाढविली जाईल.”

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “सुमारे ५ लाख लोक थेट आणि अप्रत्यक्षपणे माचिस उद्योगावर अवलंबून आहेत यात ९० टक्के महिला काम करतात. तामिळनाडू हे मॅच बॉक्सचे प्रमुख उत्पादक आहे. तर कोविलपट्टी, सत्तूर, शिवकाशी, थिउरथंगल, एट्टायापुरम, कझुगुमलाई, शंकरनकोइल, गुडियाट्टम आणि कावेरीपक्कम ही प्रमुख उत्पादन केंद्रे आहेत.


नवाब मलिकांच्या आरोपावर अमृता फडणवीसांचे सूचक ट्विट, म्हणाल्या ” चोराच्या…”


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -