घरदेश-विदेशतीव्र विरोधानंतर WhatsApp चं एक पाऊल मागे

तीव्र विरोधानंतर WhatsApp चं एक पाऊल मागे

Subscribe

नवीन प्रायव्हसी पॉलिसीला तुर्तास स्थगिती

संवादाचे लोकप्रिय असलेले WhatsApp हे माध्यम नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र आता युजर्सच्या तीव्र विरोधानंतर WhatsApp ने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसीस तुर्तास स्थगिती दिली आहे. तीन महिन्यांसाठी हा निर्णय लांबणीवर टाकण्याचा निर्णयामुळे तुर्तास तरी WhatsApp युझर्सना दिलासा मिळाला आहे. WhatsApp ने नव वर्षात नवं धोरण लागू करण्यात येण्यात असल्याचे जाहीर करुन युझर्सला एकप्रकारे धक्काच दिला होता. WhatsApp ने नवीन पॉलिसी मान्य न केल्यास ८ फेब्रुवारी २०२१ पासून तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे युझर्समध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अनेकांनी या धोरणाचा स्विकार केला परंतू सर्वाधिक युझर्सनी या नव्या पॉलिसीला तीव्र विरोध दर्शवला. फेसबुकने WhatsApp कंपनी खरेदी केली आहे. त्यानंतर फेसबुकने WhatsApp च्या पॉलिसीत बदल करण्याचा निर्णय घेत युझर्सचा संपूर्ण डेटा इंस्टाग्रामसह फेसबुकसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या नव्या पॉलिसीवर युझर्सकडून तीव्र रोष व्यक्त केला जात होता. युझर्सच्या याच नाराजीनंतर WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

त्यानंतर आज WhatsApp ने यावर आपल्या अधिकृत साईडवरुन माहिती देत, ‘व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी होत असलेले चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. ‘8 फेब्रुवारीला कोणालाही व्ह़ॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावं लागणार नाही. WhatsApp कोणत्याही युझर्सचे मेसेजेस पाहू शकत नाही किंवा केलेल्या कॉल्समधील संभाषण ऐकू शकत नाही. एवढेच नाही, तर शेअर केलेले लोकेशनही पाहू शकत नाही. फेसबुकही नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करतं यासाठी आम्ही काही पावलं उचलत आहोत. 15 मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु’, असं म्हटलं गेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -