घरताज्या घडामोडीIAF Promotes Abhinandan: पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणाऱ्या पायलट अभिनंदनला मिळाले प्रमोशन

IAF Promotes Abhinandan: पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणाऱ्या पायलट अभिनंदनला मिळाले प्रमोशन

Subscribe

कमांडर अभिनंदन आता ग्रुप कॅप्टन झाले आहेत

बालाकोट एअर स्ट्राइटमध्ये पाकिस्तानच्या एफ १६ फायटर जेटशी दोन हात करणारे भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे वायुसेनेने प्रमोशन दिले आहे. कमांडर अभिनंदन आता ग्रुप कॅप्टन झाले असून हे पद सैन्यातील कर्नल रॅकच्या बरोबरीचे आहे. सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर जेट पाडल्याने विंग कमांडर अभिनंदन यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याने हे प्रमोशन देण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन यांच्यासोबतच इतर पायलट आणि वायुसैनिकांचे देखील प्रमोशन केले आहे.

मिग-२१ बाइसन फायटर जेट उडवणारे विंग कमांडर अभिनंदन यांनी २०१९मध्ये बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकनंतर झालेल्या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानी वायुसेनेच्या अमेरिकी एफ-१६ फायटर जेटचा पराभव केला. डॉगफायटरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचे बाइसन लढाऊ विमान क्रॅश झाले होते. यावेळी अभिनंदन श्रीनगरच्या जवळ असलेल्या अवंतिपुरा एअर बेसवर तैनात होते.

- Advertisement -

मिग-२१ बाइसन विमान क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या सीमाभागात जाऊन पडले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांना ताब्यात घेतले. भारत पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धातील हे सर्वात गंभीर संकट होते. १ मार्च रोजी अभिनंदन यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले होते.

या अपघातात त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांची कसून चौकशी झाली मात्र त्यांनी भारताशी असलेली इमानदारी कायम ठेवली. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या या धाडसी कर्तृत्वाचा वीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला होता. वीर चक्र हे युद्ध काळातील तिसरे सर्वोच्च वीरतेचे पदक म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi Diwali: नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला उधळून लावलं, पंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचं कौतुक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -