घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोनापासून बचाव करेल धूप अगरबत्ती; बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील नव्या अभ्यासातून समोर

Coronavirus: कोरोनापासून बचाव करेल धूप अगरबत्ती; बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील नव्या अभ्यासातून समोर

Subscribe

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून वैज्ञानिक वेगवेगळ्या संशोधनातून हैराण करणारे निष्कर्ष समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी हिमालयातील बुरांश वनस्पती कोरोनावर मात करू शकते असे आयआयटी मंडिच्या संशोधनातून समोर आले होते. तसेच त्यापूर्वी भांग आणि गांजामधील काही संयुगे कोरोनाला रोखू शकतात, असे ऑरगन स्टेटच्या ग्लोबल हेम्प इनोव्हेशन सेंटर, कॉलेज ऑफ फार्मेसी आणि लिनुस पॉलिंग इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले होते. त्यानंतर आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी केलेल्या अभ्यासात बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना यश मिळाले आहे. संशोधनकर्त्यांनी पहिल्यांदाच हर्बल धूप अगरबत्ती तयार केली आहे. ही जाळल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. जर घरी कोरोनाबाधित आहे, तर या अगरबत्तीमुळे इतर लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू शकत नाही. तसेच कोरोनाबाधितांच्या फुफ्फुसांवर देखील परिणाम होत नाही.

बीएचयू इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे शास्त्रज्ञ डॉ. केआरसी रेड्डी म्हणाले की, आयुर्वेदात धूप थेरपीबाबतचा उल्लेख खूप जुना आहे. परंतु कोरोना महामारीबाबत जगात पहिल्यांदा सायंटिफिक अभ्यास करण्यात आला आहे. आयसीएमआरच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री (सीटीआरआय)कडून मंजूरी मिळाल्यानंतर १९ औषधी वनस्पतीवरून हर्बल धूप अगरबत्तीची (एवीएचडी) दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण केली आहे.

- Advertisement -

दोन वेगवेगळ्या गटांवर अभ्यास केल्यानंतर डॉ. रेड्डी म्हणाले की, कंट्रोल ग्रुपमध्ये १०० निरोगी व्यक्तींना सामील केले होते. दुसऱ्या इंटरवेंशन गटात १५० व्यक्तींना सामील केले गेले होते. इंटरवेंशन गटाला या अगरबत्तीचा १०-१० मिनिटे सकाळ-संध्याकाळ धूप घ्यायला सांगितला. तर दुसऱ्या गटाला अगरबत्तीचा धूप दिला नाही. तसेच दोन्ही गटाला कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले होते. एका महिन्यानंतर जे निष्कर्ष निघाले ते हैराण करणारे होते.

इंटरवेंशन गटात फक्त ६ लोकांना म्हणजेच ४ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली. तर कंट्रोल गटात ३७ लोकांना म्हणजेच ३७ टक्के लोकांमध्ये कोरोनासारखी लक्षणे जसे की ताप, खोकला, सर्दी, चव, वास न येणे अशी लक्षणे दिसून आली. तसेच धूप अगरबत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा देखील अभ्यास केला. त्यावेळेस या अगबरबत्तीमुळे कोणतेही नुकसान होत नसल्याचे समोर आले.

- Advertisement -

डॉ. रेड्डी म्हणाले की, भारतसह संपूर्ण जगात पहिल्यांदाच धूप अगरबत्तीवर संशोधन करण्यात आले. ज्याचे तीन मोठे परिणाम समोर आले आहेत. धूप अगरबत्तीमुळे कोरोना संसर्ग आणि इतर कोणत्याही व्हायरसचा धोका खूप कमी होतो. तसेच हवेतील शरीरात प्रवेश करणाऱ्या व्हायरसला घशातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो.


हेही वाचा – जपानी लोकांसारखे दीर्घायुषी व्हायचय? मग डाएटमध्ये करा ‘हा’ बदल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -