घरदेश-विदेशBreaking: अलीगढमध्ये खासगी विमानाला अपघात

Breaking: अलीगढमध्ये खासगी विमानाला अपघात

Subscribe

अलीगढमधील धनीपूर येथील धावपट्टीवर एका खासगी विमानाला अपघात झाला आहे. खासगी प्रशिक्षण देणारे VT-AVV हे विमान आज सकाळी क्रॅश झाले. या विमानात सहा लोक होते, अजूनपर्यंत तरी कुणाला दुखापत झालीये का याची माहिती मिळालेली नाही. विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे चाक वायरमध्ये अडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानातील सहा प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आल्याची माहिती शहर दंडाधिकारी विनित कुमार सिंह यांनी दिली. तसेच विमानाची आग भडकू नये यासाठी आग विझवणारे बंबही तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असून परिस्थितीवर आता नियंत्रण मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -