घरताज्या घडामोडीSurya Namaskar : सूर्य नमस्कार हा पूजेचा प्रकार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल...

Surya Namaskar : सूर्य नमस्कार हा पूजेचा प्रकार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

Subscribe

देशभरातील शाळांमध्ये १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत सूर्य नमस्कार आयोजन करण्याच्या सरकारी आदेशावरून आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने शाळांमध्ये सूर्य नमस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (All India Muslim Personal Law Board) ने देशातील सरकारी शाळांमध्ये सूर्य नमस्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने स्पष्ट केले आहे की, मुस्लिम विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना खालिद रहमानी यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करत स्पष्ट केले की, मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरकारकडून सूर्य नमस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणे टाळावे. संघटनेचे महासचिव मौलाना खालिद रहमानी यांनी टीका केली की, सरकार बहुमताच्या जोरावर परंपरा आणि संस्कृती दुसऱ्यावर थोपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हा प्रकार असंविधानिक आहे. सूर्य नमस्कार हा देशभक्ती नव्हे तर पूजेचा एक प्रकार असल्यानेच मुस्लिम विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. म्हणूनच सरकारने हे फर्मान मागे घ्यायला हवे. देशात धर्मनिरपेक्ष मूल्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सरकारने सध्या जनतेला भेडसावणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

युजीसीने २९ डिसेंबरला एक परिपत्रक जारी करत देशातील ३० हजार संस्थांमधील तीन लाख विद्यार्थ्यांना भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हायचे आवाहन केले होते. तिरंग्यासमोर सूर्यनमस्कार करण्याचे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत १ जानेवारी ते ७ दरम्यान ३० हजार संस्थांमध्ये सूर्यनमस्कारासाठी ३ लाख जणांना सहभागी होण्याचे आवाहन करणारे हे परिपत्रक जारी करण्यात आले होते.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या या आक्षेपावर योगी सरकारमधील मंत्री मोहसिन रजाने पलटवार केला आहे. सूर्य नमस्काराला विरोध करणारे हे अखिलेश यादवला नमस्कार करतील, मुलायम सिंह यांना नमस्कार करतील, राहुल गांधी आणि सोनिया गांधींना नमस्कार करतील. ज्याठिकाणी ऊर्जा आणि प्रकाश निर्माण होतो तिथे नमस्कार करणार नाही. पण जिथे पैशाने खिसे भरतात त्याठिकाणी नमस्कारासाठी यांना अडचण नाही. सूर्यातून भगवा प्रकाश निघतो, म्हणून भगव्याचा विरोध होतो आहे. हा फक्त कोणाला तरी खूश करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -