घरताज्या घडामोडीजगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ, गंभीर आजारग्रस्त व्यक्तींना मोठा धोका

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ, गंभीर आजारग्रस्त व्यक्तींना मोठा धोका

Subscribe

परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना रेड सिग्नल...

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. या व्हेरियंटचा नाव ओमिक्रॉन असं आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात सुद्धा हा व्हायरस पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील टॉप वायरोलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ एक्सपर्टच्या मते, अशा परिस्थितीत लोकांना कोविड व्हॅक्सीनचा बुस्टर डोस देण्याचा विचार करण्यात आला पाहीजे. देशात पहिल्यापासूनच अधिक धोका असणाऱ्या व्यक्तींना बुस्टर डोस दिला जात आहे.

AIIMSचे माजी डीन आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे वैज्ञानिक डॉ. एन के. मेहरा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर निरीक्षणात एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींवर व्हॅक्सिनचा प्रभाव कमी प्रमाणात होतो. ज्येष्ठ व्यक्ती आणि कमजोरी असलेल्या इम्यूनिटी लोकांसाठी व्हॅक्सिनेशन खूप गरजेचे आहे. कॅन्सरग्रस्त आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट करणाऱ्या लोकांसाठी व्हॅक्सिनच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे.

- Advertisement -

तिसऱ्या डोसमुळे व्हायरसचं म्यूटेशन रोखण्यास मदत

मेहरा यांनी सांगितलंय की, कोविड व्हॅक्सीन संक्रमणापासून १०० टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. परंतु याबाबतचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे. व्हॅक्सिन घेतल्यामुळे गंभीर लक्षणं दूर होऊ शकतात. विशेषत: कमी इम्यूनिटी पावर असणाऱ्या व्यक्तींचा गंभीर लक्षणांपासून बचाव करण्यासाठी तिसरी डोस घेणं उत्तम आणि फायदेशीर समजलं जातंय. अधिक काळापर्यंत हे लोकं व्हायरसवर मात करू शकतात. तिसऱ्या डोसमुळेच व्हायरसला नव्या व्हेरियंटमध्ये म्यूटेट होण्यापासून रोखलं जाऊ शकतं.

आफ्रिकेत HIV रूग्णांना रिकव्हर होण्यासाठी जास्त कालावधी

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची सुरूवात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच झाली. हा व्हेरियंट HIV/AIDS असलेल्या रूग्णांमध्ये आढळून आला होता. आरोग्य चांगली असलेली व्यक्ती २ ते ३ आठवड्यांमध्येच बरी होते. तर कमी इम्यूनिटी असलेली व्यक्ती २ ते ३ महिन्यांपर्यंत पॉझिटिव्ह राहते.

- Advertisement -

परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना रेड सिग्नल

नवी दिल्लीतील AIIMS मध्ये ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी सांगितलं की, परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना रोखणं गरजेचं आहे. भारतात पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. या व्हेरियंटवर व्हॅक्सीनचा प्रभाव किती आहे. हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा: माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, घराजवळील सुरक्षेत मोठी वाढ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -