घरदेश-विदेशजमावाकडून मारहाणीनंतर पोलिसांनी देखील 'त्याला' मारले

जमावाकडून मारहाणीनंतर पोलिसांनी देखील ‘त्याला’ मारले

Subscribe

राजस्थानमधील अलवारमध्ये जमावाने मारहाण के्ल्यानंतर पोलिसांनी देखील रकबार खानला मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. त्यामनुळे रकबारचा मृत्यू झाल्याचा आरोप आता केला जात आहे.

राजस्थानमधील अलवारमध्ये रकबार खान मारहाण प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. रकबार खानला गाई तस्करी करत असल्याच्या संशयाने मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी रकबारची जमावाच्या तावडीतून सुटका केली . मात्र सुटकेनंतर पोलिसांनी रकबारला रूग्णालयामध्ये घेऊन जाणे अपेक्षित होते. पण रकबारला पोलिसांनी देखील मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मारहाणीनंतर रकबार खानला ३ तास ४५ मिनिटे उशिराने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय रकबारला रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्रवासादरम्यान पोलिसांनी चहापाण्यासाठी देखील वेळ काढल्याचा दावा एका वृत्तवाहिनेने केला आहे. रकबारला वेळेत रूग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याचा जीव वाचला असता. पण पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आता केला जात आहे. जमावाच्या मारहाणीनंतर रूग्णालयामध्ये नेताना रकबार खानचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मध्यरात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी रकबारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून २० मिनिटांनी रकबारला रूग्णालयामध्ये दाखल करणे अपेक्षित होते. पण रकबारला रूग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी ४ वाजले. वेळेवर उपचार न मिळाल्याने रकबारला मृत्यू झाला.

रकबारच्या मृत्यूला पोलीस जबाबदार?

दरम्यान, पोलिसांनी देखील रकबारला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केला आहे. मी स्थानिकांशी बोललो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी देखील रकबारला मारहाण केल्याचा दावा आमदार अहुजा यांनी केला आहे. रकबारला पोलिसांच्या हवाली करण्यात आले त्यावेळी त्याची प्रकृती अस्थिर होती. पण त्यानंतर देखील पोलिसांनी रकबारला मारहाण केली असे आमदारांनी स्थानिकाचा आधार घेत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे राजस्थान मारहाण प्रकरण

गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून रकबार खान ( २८ ) याला जमावाने मारहाण केली. राजस्थानमधील अलवार या ठिकाणी रकबारला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील मेवतचा रहिवासी असलेला रकबार प्राण्यांची वाहतूक करत होता. त्यावेळी गाईंची तस्करी होत असल्याचा संशय जमावाला आला. त्यानंतर त्यांनी रकबारला अडवून जबर मारहाण केली. यामध्येच रकबारचा मृत्यू झाला. यावेळी रकबार सोबत आणखी एक जण देखील होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -